IMPIMP

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 2256 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pimpri Corona Update | In Pimpri Chinchwad, the number of corona patients has decreased there is no death today Learn other statistics

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइनपिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना बाधित (Pimpri Corona Update) रुग्णांच्या संख्येत चढ उतार पहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून हजाराच्या आसपास रुग्ण आढळून येत आहेत. याचदरम्यान रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या कमी होत आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona Update) 1180 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 2256 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

आज दिवसभरात शहरातील विविध तपासणी केंद्रावर 06 हजार 925 संशयित लोकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 1180 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह (Pimpri Corona Update) आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 लाख 53 हजार 002 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 2256 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत 3 लाख 38 हजार 323 रुग्णांनी कोरोनावर (Recover patient) मात केली आहे.

 

शहरामध्ये सध्या 10,830 ॲक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत. यामध्ये 272 संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत तर 10,558 होम क्वारंटाईनमध्ये आहेत.
शहरामध्ये 04 रुग्णांच्या मृत्यूची (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) नोंद झाली आहे.
गेल्या 24 तासात 01 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,580 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

Web Title :- Pimpri Corona Update | 2256 corona patients discharged in Pimpri Chinchwad in last 24 hours find out other statistics

 

हे देखील वाचा :

Ankita Lokhande Video | लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यानंतर अंकिता लोखंडे देणार Good News? खास पूजेचा व्हिडिओ झाला व्हायरल

Pune Crime | धक्कादायक ! अभिनेता बनण्याचं स्वप्न भंगल्याने नैराश्यातून तरुणाची आत्महत्या

Mula Mutha Riverfront Development | मुळा- मुठा नदीकाठ सुधार योजना ! संगमवाडी ते बंडर्गान पुला दरम्यानच्या कामाची निविदा उघडली; जाणून घ्या

 

Related Posts