IMPIMP

Ankita Lokhande Video | लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यानंतर अंकिता लोखंडे देणार Good News? खास पूजेचा व्हिडिओ झाला व्हायरल

by nagesh
Ankita Lokhande Video | ankita lokhande reacts helariously as her mother in law demands good news video viral

सरकारसत्ता ऑनलाइन – अलीकडेच अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आपला प्रियकर विक्की जैन (Vicky Jain) सोबत लग्नबंधनात अडकली. अंकिताचं लग्न एकदम धुमधडाक्यात पार पडलं. तिच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ (Ankita Lokhande Video) सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेले पाहायला मिळतात. मात्र आता लग्नानंतर अंकिताचा एक व्हिडिओ तीव्र प्रमाणात व्हायरल (Ankita Lokhande After Marriage Video ) झाला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये लग्नानंतर अंकिता प्रथमच सासरी गेली आहे. तर विकीच्या घरात तिची एक पूजा ठेवली आहे. या पूजेत अंकिताच्या सासरचे सहभागी आहेत. तिचा या पूजेचा व्हिडिओ एका अनोख्या कारणामुळे चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये अंकिता गुड न्यूज देणार का नाही ? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

 

 

व्हायरल झालेला व्हिडिओमध्ये अंकिताची सासू तिची पूजा करत आहे. तसेच तिला लवकरच गुड न्यूज देण्याची मागणी करत आहे. व्हिडिओमध्ये अंकिताची सासू प्रथम येते आणि तिची ओटी भरते. साडीमध्ये इतर वस्तू ठेवते व तिला आशीर्वाद देते. त्यावेळी तिची सासू म्हणते, अंकिता दूधो नहाओ, पूतो फलो… लवकर गुड न्यूज दे.’ मात्र यावेळी अंकिताच्या चेहऱ्यावरील रिएक्शन एकदमच वेगळी असून, ती जोरात हसते.

 

दरम्यान, हा व्हिडिओ अंकितानं इंस्टाग्रामवर (Ankita Lokhande Instagram Video) शेअर केला असून, कॅप्शनमध्ये लिहिलं की, “बिलासपूरची ट्रीप नेहमी आठवणीत राहील. यासाठी मम्मा आणि वहिनी खूप खूप धन्यवाद.” या व्हिडिओला अनेक चाहत्यांनी कमेंट करून प्रेम व्यक्त केले. तर कमेंट मधून चाहते अंकिताला आशीर्वाद देताना दिसत आहे.

 

Web Title :- Ankita Lokhande Video | ankita lokhande reacts helariously as her mother in law demands good news video viral

 

हे देखील वाचा :

Pune Crime | धक्कादायक ! अभिनेता बनण्याचं स्वप्न भंगल्याने नैराश्यातून तरुणाची आत्महत्या

Mula Mutha Riverfront Development | मुळा- मुठा नदीकाठ सुधार योजना ! संगमवाडी ते बंडर्गान पुला दरम्यानच्या कामाची निविदा उघडली; जाणून घ्या

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांना DA बाबत मिळणार चांगली बातमी, ‘या’ कर्मचार्‍यांच्या भत्त्यात 14% वाढ

 

Related Posts