IMPIMP

PM Kisan Samman Nidhi | तारीख ठरली! पुढील आठवड्यात ‘या’ दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात येतील पैसे

by sachinsitapure

नवी दिल्ली : PM Kisan Samman Nidhi | देशातील शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे. आता पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या १७व्या हप्त्यासाठीची प्रतीक्षा संपणार आहे. केंद्रात एनडीए सरकार (NDA Govt) गठित झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कार्यभार स्वीकारताच पीएम किसान सन्मान निधीचा पुढील हप्ता मंजूर करण्याच्या फाईलवर सही केली आहे. मात्र, तारीख समोर आली नव्हती. परंतु आज समजले आहे की, १८ जून २०२४ ला शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जाईल.

पीएम मोदी १८ जूनला वाराणसीत असणार आहेत, आणि तेथूनच शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीचा पुढील हप्ता दिला जाईल.

देशातील ९.३ कोटी शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून ही आर्थिक मदत डायरेक्ट बेनेफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीद्वारे थेट त्यांच्या खात्यात मिळेल.

प्रत्येक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये ट्रान्सफर होतील आणि १७व्या हप्त्याद्वारे केंद्र सरकार यावेळी एकुण २० हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवणार आहे.

Related Posts