IMPIMP

PM Kisan Samman Nidhi Yojana | शेतकऱ्यांसाठी खूशखबर ! 10 वा हप्ता मिळणाऱ्या शेतकऱ्यांची यादी मोदी सरकारकडून जारी; जाणून घ्या

by nagesh
pm kisan samman nidhi yojana pm modi to release 11th installment today how to check your name online

नवी दिल्ली : वृत्तसंस्था PM Kisan Samman Nidhi Yojana | केंद्रातील मोदी सरकार (Modi Government) अनेक वेगवेगळ्या योजना आणत असते. त्यातच शेतक-यांच्या हितासाठी पीएम शेतकरी सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) अनेक दिवस झाली चालत आहे. या योजनेअंतर्गत लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी (Farmers) आता एक खूशखबर आहे. ज्या लाभार्थी शेतकऱ्यांना ही रक्कम मिळणार आहे त्याची बेनिफिशियरी लिस्ट म्हणजे लाभार्थी यादी मोदी सरकारकडून जारी करण्यात आली आहे. त्यामुळे यादीत नाव असणा-या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

मिळालेल्या माहितीनूसार, यंदाचा मिळणारा हप्ता 15 ते 25 डिसेंबरदरम्यान केव्हाही थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. याबाबत सरकारने (Modi government) योजना देखील आखली आहे. त्यामुळे शेतक-यांनी लाभ मिळण्यासाठी संबधित यादीमध्ये नाव तपासायचे आहे. या योजनेसाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Samman Nidhi Yojana) लाभार्थी शेतकऱ्यांना 2 हजार रुपये पाठवते. आतापर्यंत या योजनेचे 9 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात देण्यात आले आहेत. खरं तर या योजनेचं उद्दिष्ट्य म्हणजे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं आहे.

 

यादीमध्ये तुमचं नाव कसं पाहाल?

– याकरता शेतकऱ्यांना pmkisan.gov.in या वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल.

– त्यानंतर त्याठिकाणी दिसणाऱ्या ‘फार्मर कॉर्नर’ (Farmers Corner) या टॅबवर क्लिक करा.

– याठिकाणी जाऊन तुम्ही तुमच्या नावाची या योजनेसाठी नोंदणीही करू शकता.

– याठिकाणी या योजनेचे लाभार्थी असणाऱ्या शेतकऱ्यांचे नाव, राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव तुम्हाला सहजरित्या मिळू शकेल.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

या दरम्यान, तुमच्या अर्जाची सध्याची स्थिती काय आहे याबाबत माहिती तुम्ही किसान आधार नंबर/अकाऊंट नंबर आणि मोबाइल नंबरद्वारेही मिळवू शकणार आहे. तसेच, फार्मर कार्नरवर जाऊन Beneficiary Status च्या लिंकवर क्लिक केल्याने याठिकाणी तुम्हाला आधार नंबर, अकाउंट नंबर आणि मोबाइल नंबर द्यावा लागेल. यानंतर तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा, उप-जिल्हा आणि गावाची माहिती द्यावी लागेल. त्यानंतर तुम्ही Get Report वर क्लिक केल्यास सर्व यादी मिळू शकेल. तर, याठिकाणी सरकार लाभार्थ्यांची पूर्ण यादी देखील अपलोड करते.

 

Web Title :- PM Kisan Samman Nidhi Yojana | PM Kisan Samman Nidhi Yojana beneficiaries will get 10th installment money in next week check beneficiary list

 

 

हे देखील वाचा :

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात पत्नीच्या त्रासाला कंटाळून 32 वर्षीय तरूणाची आत्महत्या; लोणी काळभोर परिसरातील घटना

WhatsApp Disappearing Messages | ‘हे’ फीचर कसे करते काम, असे करा Enable आणि Disable, वाढेल फोनचा स्पीड

Pune Crime | ‘चेअरमनने किया वैसाही मै करुंगा’ ! सोसायटी चेअरमनविरोधात केलेली तक्रार मागे घेण्यासाठी केला विनयभंग

 

Related Posts