IMPIMP

WhatsApp Disappearing Messages | ‘हे’ फीचर कसे करते काम, असे करा Enable आणि Disable, वाढेल फोनचा स्पीड

by nagesh
WhatsApp Disappearing Messages | how to enable or disable whatsapp disappearing messages details

नवी दिल्ली : वृत्तसंस्था WhatsApp Disappearing Messages चे एक फीचर आहे. हे फीचर तुमच्या फोनची इंटरनल मेमरी वाचवण्यास मदत करते. यास यूजरला आपल्या व्हॉट्सअपच्या सेटिंगमध्ये जाऊन Enable किंवा Disable करावे लागते. याचा फायदा हा होतो की, तुमचे मेसेज एका विशिष्ट वेळेनंतर आपोआप डिलिट होतात. यामुळे तुमच्या फोनची मेमरी वाचते आणि फोन स्लो होत नाही. (WhatsApp Disappearing Messages)

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

Whatsapp नुसार जेव्हा तुम्ही Disappearing Messages फीचर एनेबल (Enable) करता तेव्हा तुम्हाला 24 तास, 7 दिवस किंवा 90 दिवसांचा कालावधी सिलेक्ट करावा लागतो. याचा अर्थ तुम्ही जो कालावधी सिलेक्ट कराल त्यानंतर मेसेज आपोआप तुमच्या फोनमधून डिलीट होतील. मात्र हे लक्षात ठेवा की, हे केवळ त्याच मेसेजवर लागू होते जे या सेटिंगनंतर पाठवले जातील किंवा रिसिव्ह केले जातील.

 

यूजर एखाद्या इंडिव्हिज्युअल चॅटसाठी सुद्धा हे ऑन किंवा ऑफ करू शकतात. एखाद्या ग्रुप चॅटसाठी सुद्धा असे करता येऊ शकते. याशिवाय एखाद्या ग्रुपसाठी अ‍ॅडमिन Disappearing Messages फीचर ऑन किंवा ऑफ करू शकतो की जर कुणी ग्रुप मेंबर एखादा मेसेज 24 तास, 7 दिवस किंवा 90 दिवसांपर्यंत पहात नसेल तर तो आपोआप डिलिट होईल.

 

Iphone आणि Android मध्ये Disappearing Messages कसे करावे ऑन?

– सर्वप्रथम WhatsApp chat उघडा.

– त्यानंतर नावावर टॅप करा.

– यानंतर Disappearing Messages वर टॅप करा.

– यानंतर तुम्ही 24 तास, 7 दिवस आणि 90 दिवसांचा कालावधी सिलेक्ट करू शकता.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

Iphone आणि Android मध्ये disappearing messages असे बंद करा

– हे फीचर ऑन केल्यानंतर चॅटचे मेसेज आपोआप डिलिट होणार नाहीत.

– सर्वप्रथम WhatsApp chat उघडा.

– यानंतर नावावर टॅप करा.

– यानंतर Disappearing Messages वर टॅप करा, आणि ते बंद करा.

 

Web Title :- WhatsApp Disappearing Messages | how to enable or disable whatsapp disappearing messages details

 

हे देखील वाचा :

Pune Crime | ‘चेअरमनने किया वैसाही मै करुंगा’ ! सोसायटी चेअरमनविरोधात केलेली तक्रार मागे घेण्यासाठी केला विनयभंग
Rayat Shikshan Sanstha | रयत शिक्षण संस्थेत तब्बल 1189 पदांसाठी मेगा भरती; जाणून घ्या सविस्तर

OBC Reservation | ‘पवार कुटुंब राज्यातील ओबीसींचा कर्दनकाळ’, भाजप आमदाराचा घणाघाती आरोप

 

Related Posts