IMPIMP

PM Kisan Yojana | ‘या’ तारखेला जमा होईल PM Kisan चा 10 हप्ता, जाणून घ्या रजिस्ट्रेशन करण्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस

by nagesh
PM Kisan | changes in the rules regarding the status of pm kisan scheme now mobile number will not be needed

नवी दिल्ली : वृत्तसंस्था PM Kisan Yojana | सरकार लवकरच पीएम किसान योजनेतील शेतकर्‍यांच्या खात्यात दहावा हप्ता जारी करणार आहे. सरकार 15 डिसेंबरच्या जवळपास पीएम किसान योजनेचा (PM Kisan Yojana) हप्ता जारी करेल. प्रधानमंत्री किसान सम्मान निधी (PM Kisan Samman Nidhi Yojana) केंद्र सरकारची एक महत्वाची योजना आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

आतापर्यंत 9 हप्ता पाठवले

या योजनेंतर्गत सरकारद्वारे शेतकर्‍यांना दरवर्षी 6,000 रुपयांची थेट रोख मदत उपलब्ध केली जाते. ही रक्कम दोन हजार रूपयांच्या तीन हप्त्यात शेतकर्‍यांच्या खात्यात ट्रान्सफर केली जाते. सरकारने योजना सुरू केल्यापासून आतापर्यंत एकुण 9 हप्ता पाठवले आहेत.

नोंदणी करण्याची ही योग्य वेळ

जर तुम्ही शेतकरी आहात आणि अजूनपर्यंत पीएम किसान योजनेत (PM Kisan Yojana) नोंदणी केली नसेल तर नोंदणी करण्याची ही योग्य वेळ आहे. तुमचा अर्ज स्वीकारल्यानंतर तुमच्या खात्यात 2000 रुपये येतील. काही अतिशय सोप्या स्टेप फॉलो करून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता.

 

 स्टेप बाय स्टेप प्रोसेस…

पहिला टप्पा

– PM Kisan Yojana मध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वप्रथम पीएम किसानची ऑफिशियल वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जा.

– पेज उघडल्यानंतर उजव्या बाजूला Farmers Corner चा एक पर्याय दिसेल.

– यानंतर Farmers Corner मध्ये New Farmer Registration च्या ऑपशनवर क्लिक करा.

– नंतर समोर आलेल्या नवीन पेजवरील ड्रॉप डाऊन लिस्टमधून पसंतीची भाषा निवडा.

– नंतर Rural Farmer Registration किंवा Urban Farmer Registration मधून एक ऑपशन निवडा.

– नंतर आधार नंबर नोंदवा.

– आता मोबाइल नंबर नोंदवा.

– यानंतर ड्रॉपडाऊन लिस्टमधून राज्याचे नाव निवडा.

– कॅप्चा कोड एंटर करून Send OTP वर क्लिक करा. यानंतर आधारसोबत लिंक मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल.

– ओटीपी एंटर केल्यानंतर कॅप्चा कोड भरून प्रोसेस पुढे न्या.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

दुसरा टप्पा

– तुम्ही भरलेला ओटीपी योग्य असेल तर एक नवीन पेज उघडेल. येथे भाषा निवडा.

– यानंतर ड्रॉप डाऊन लिस्टमधून राज्य, जिल्हा, उप-जिल्हा, ब्लॉक आणि गावाची निवड करा.

– यानंतर नाव, लिंग, श्रेणी, शेतकरी प्रकार, आयएएफएससी कोड, बँकेचे नाव, अकाऊंट नंबर, मोबाईल नंबरसह पूर्ण पत्ता, जमिनीचा
रजिस्ट्रेशन नंबर, रेशन कार्ड नंबर, जन्म तारीख टाकून Submit for Aadhaar Authentication वर क्लिक करा.

– जमीनीचा सर्वे आणि खातेनंबर नोंदवा.

– आता जमीनीची माहिती, आधार कार्ड नंबर आणि बँक पासबुक अपलोड करा.

– यांनतर सेल्फ डिक्लरेशन बॉक्सवर टिक करा आणि सेववर क्लिक करा.

 

Web Title: PM Kisan Yojana | pm kisan yojana the tenth installment of pm kisan will be credited on this date know the step by step process of registration marathi news

 

हे देखील वाचा :

Bombay High Court | प्रेयसीनं दगा देणं म्हणजे प्रियकराला आत्महत्येस प्रवृत्त करणं? उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

Nitesh Rane | ‘मालकाच्या घरीच ‘गांजाचा बादशाह’ – नितेश राणेंची संजय राऊतांवर सडकून टीका

EPFO | पीएफ कर्मचार्‍यांसाठी लवकरच खुशखबर ! अकाऊंटमध्ये येणार मोठी रक्कम, जाणून घ्या

 

Related Posts