IMPIMP

Bombay High Court | प्रेयसीनं दगा देणं म्हणजे प्रियकराला आत्महत्येस प्रवृत्त करणं? उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

by nagesh
Palghar Sadhu Case | palghar sadhu murder 10 released on bail mumbai bombay high court Justice Bharati Dangre

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाइन –  प्रेयसीनं प्रैमात दगा दिला म्हणजे प्रियकराला आत्महत्येसाठी (commits suicide) प्रवृत्त केलं का ? यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) महत्त्वाचा निकाल दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) नागपूर खंडपीठाने हा निकाल दिला आहे. प्रेयसीनं (girlfriend) प्रेमात दगा दिला म्हणजे तिने प्रियकराला (boyfriend) आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केलं, असा त्याचा अर्थ होत नसल्याचं नागपूर खंडपीठाने (Nagpur Bench) म्हटलं आहे. हा महत्त्वाचा निर्णय देताना खंडपीठाने संबंधित मुलीला दिलास देऊन तिच्या विरोधात दाखल करण्यात आलेला गुन्हा (FIR) रद्दबातल ठरवला आहे. नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती विनय देशपांडे (Justices Vinay Deshpande) आणि पुष्पा गणेडीवाला (Judge Pushpa Ganediwala) यांनी हा निकाल दिला.

याचिका दाखल करणाऱ्या तरुणीचे 2018 पासून प्रणय मोरे (Pranay More) नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते.
काही दिवसांनी त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध राहिले नाहीत. त्यानंतर तरुणी एअर हॉस्टेसच्या (Air hostess) ट्रेनिंगसाठी लखनऊ येथे गेली.
या ठिकाणी गेल्यानंतर तिचे एका अन्य मुलासाबोत प्रेमसंबंध सुरु असल्याचा संशय प्रणय याला आला. यावरुन दोघांमध्ये वाद झाले.
तरुणीने आपले कोणासोबत प्रेमसंबंध नसल्याचे प्रणयला समजावून सांगितले. मात्र, प्रणयचे तिच्या उत्तराने समाधान झाले नाही.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

दरम्यान, 12 फेब्रुवारी 2020 रोजी तरुणी लखनऊ (Lucknow) येथे एका एअर हॉस्टेसची मुलाखत देऊन नागपूरला परतली.
लखनऊवरुन नागपूरमध्ये आल्यानंतर प्रणयने तिला कळमेश्वर येथील आपल्या खोलीवर घेऊन गेला.
लांबचा प्रवास करुन थकल्याने तरुणी प्रणयच्या खोलीमध्ये झोपली.
ती झोपल्यानंतर प्रणय याने त्याच खोलीत गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली.

याप्रकरणी कळमेश्वरी पोलिसांनी (Kalmeshwari police) 23 जानेवारी 2021 रोजी संबंधित तरुणीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला.
यामुळे तरुणीने नागपूर खंडपीठात धाव घेत FIR च्या विरोधात याचीका दाखल केली.
या याचिकेवर झालेल्या सुनावणीवर निकाल देताना मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) नागपूर खंडपीठाने महत्त्वाचा निकाल दिला आहे.
तसेच याचिकाकर्त्या तरुणीला दिलासा देत तिच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्दबातल ठरवला.

 

Web Title : Bombay High Court | if girlfriend cheat with boyfriend does it mean she forced boyfriend to commits suicide bombay high court verdict

 

हे देखील वाचा :

Nitesh Rane | ‘मालकाच्या घरीच ‘गांजाचा बादशाह’ – नितेश राणेंची संजय राऊतांवर सडकून टीका

MP Supriya Sule | ‘ED, पाऊस राष्ट्रवादीसाठी ‘लकी’च’

EPFO | पीएफ कर्मचार्‍यांसाठी लवकरच खुशखबर ! अकाऊंटमध्ये येणार मोठी रक्कम, जाणून घ्या

Shivsena Vs Devendra Fadnavis | भाजपकडून पडद्याऐवजी ‘पदरां’चा वापर; शिवसेनेची सामनातून टीका

 

Related Posts