IMPIMP

PMC Shahari Garib Yojana | शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजनेचे सभासदत्व घेण्याचे पुणे महापालिकेचे आवाहन

by nagesh
PMC

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – PMC Shahari Garib Yojana | पुणे शहरातील सर्व नागरिकांसाठी पुणे महापालिकेकडून (Pune Municipal Corporation (PMC) विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. त्यापैकीच एक योजना म्हणजे शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना (PMC Shahari Garib Yojana). या योजनेअंतर्गत गरीब व गरजू नागरिकांना पुणे महापालिकेच्या (Pune PMC News) दवाखान्यात मोफत उपचार मिळतात. याशिवाय, खासगी दवाखान्यांमध्ये कराव्या लागणाऱ्या आवश्यक त्या उपचाराच्या एकूण खर्चात सूट मिळते. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना या योजनेचे सभासदत्व घ्यावे असे आवाहन आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार (PMC Health Officer Dr. Bhagwan Pawar) व सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. मनिषा विनोद नाईक (Dr. Manisha Vinod Naik) यांनी केले आहे. (PMC Shahari Garib Yojana)

शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना ही पुणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील पिवळे रेशनकार्डधारक (Yellow Ration Card), ग.व.नि सेवाशुल्क धारक व केशरी रेशनकार्ड धारक (Orange Ration Card) ज्यांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपये आहे अशांना या योजनेचा लाभ मिळतो. दरवर्षी 1 एप्रिल ते 31 मार्च या कालवाधीत ही योजना लागू केली जाते. तसेच ज्या नागरिकांनी या योजनेचे सभासदत्व घेतले आहे अशांनाच या योजनेचा लाभ मिळतो. ही योजना केवळ जनरल वॉर्डसाठी लागू आहे. (PMC Shahari Garib Yojana)

शहरी गरीब वैद्यकीय योजनेंतर्गत पॅनेलवरील खासगी हॉस्पिटलमधील अंर्तरुग्ण विभागातील वैद्यकीय उपचारांसाठी सी.जी.एस.एस. मान्य दराने 50 टक्के किंवा 100 टक्के हमीपत्रांतर्गत एका वर्षासाठी एका कुटुंबाला जास्तीत जास्त एक लाख किंवा दोन लाख या कमाल मर्यादेपर्यंत खर्च करता येतो. या मर्यादेपेक्षा जास्त होणारा खर्च रुग्णांनी भरणे आवश्यक आहे.

सभासदत्व घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे

1. एक लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न असल्याचा तहसीलदार कार्यालयाचा दाखला.
2. पुणे मनपा कार्यक्षेत्रातील पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड
3. झोपडपट्टीत राहत असल्याची पुणे महानगरपालिकेकडे नोंद असलेली पावती
4. अपत्यांचे आधार कार्ड (25 वर्षा खालील)
5. कुटुंबातील पात्र सर्व सभासदांचे आधार कार्ड (मनपा कार्यक्षेत्रातील)
6. पात्र सभासदांचे दोन फोटो (आयकार्ड साईझ)
7. योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांकडून प्रत्येक आर्थिक वर्षासाठी एकूण 200 रुपये (सभासद नोंदणी शुल्क रु.100 आणि वार्षिक शुल्क रु.100) शुल्क आकारले जाते.

Web Title : PMC Shahari Garib Yojana | Appeal of Pune Municipal Corporation to take membership of Shahari Garib Yojana Scheme

Related Posts