IMPIMP

Pune Artists For Vienna Music Festival | ऑस्ट्रियामध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय संगीत महोत्सवात सहभागी होणार पुण्याचे तीन युवा वादक

by nagesh
Pune Artists For Vienna Music Festival | three young artists from pune selected for music program in austria

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Artists For Vienna Music Festival | भारताची आणि ऑस्ट्रियाची 75 वर्षांची राजकीय मैत्री साजरी करण्यासाठी ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या 17 जूनला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून येथे संगीत महोत्सव पार पडणार आहे. या संगीत महोत्सवासाठी पुण्यातील 3 तीन वादकांची निवड झाली आहे. या कार्यक्रमात भारतातून 27 युवा वादक आणि गायकांची निवड करण्यात आली असून त्यापैकी तीन जण हे पुण्यातले आहेत. (Pune Artists For Vienna Music Festival)

या इंटरनॅशल कार्यक्रमासाठी पुण्यातील रुचिर इंगळे (Ruchir Ingle), इरावती जोशी (Irawati Joshi), अंतरा बापट (Antara Bapat) यांची निवड झाली आहे. इंडियन नॅशनल युथ ऑर्केस्ट्रा अँड कोरस (Indian National Youth Orchestra and Chorus) आणि व्हिएन्ना युनिव्हर्सिटी फिलहार्मोनिक (Vienna University Philharmonic) यांच्यातर्फे संगीतकार कार्ल ऑर्फ (German Compose Carl Orff)यांनी संगीतबद्ध केलेला कार्मिना बुराना (Carmina Burana By Carl Orff) हा संगीत कार्यक्रम पार पडणार आहे. हा कार्यक्रम 17 जूनला व्हिएन्ना येथे होणार असून त्यानंतर या संगीत कार्यक्रमाचे सादरीकरण भारतात देखील होणार आहे. 29 ऑक्टोबरला भारतातील लखनऊ (Lucknow) येथे तर 31 ऑक्टोबरला राजधानी दिल्ली (Delhi) येथे हा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. (Pune Artists For Vienna Music Festival)

आंतरराष्ट्रीय स्तरावरील हा संगीत कार्यक्रम (International Music Event) असून पुण्याचे तीन रुचिर इंगळे, इरावती जोशी, अंतरा बापट यांना व्हायोलिन (Violin) वादनाची संधी मिळाली आहे. या कार्यक्रमात 27 लोक देशाचे प्रतिनिधित्व करणार असून त्यापैकी तीन पुण्यातील वादक आहेत. या तिघांवर कौतुकांचा वर्षाव होत असून अनेक जण त्यांना शुभेच्छा देत आहे.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

रुचिर, इरावती आणि अंतरा सुझुकी स्कूल ऑफ व्हायोलिनच्या (Suzuki School Of Violin)
संस्थापिका रमा चोभे (Rama Chobhe) यांच्याकडे वादन शिकत आहे.
रुचिर, इरावती आणि अंतरा यांनी ही सुवर्णसंधी मिळाली
असून त्यामागे त्यांची पूर्ण एका तपाची वादनाची उपासना आहे.
हे तिघे गेली बारा वर्षे सुझुकी स्कूल ऑफ व्हायोलिनच्या संस्थापिका रमा चोभे यांच्याकडे व्हायोलिन वादनाचे धडे गिरवत आहेत. (India And Austria)

Web Title : Pune Artists For Vienna Music Festival | three young artists from pune selected for music program in austria

Related Posts