IMPIMP

Pollution And Coronavirus | सावधान ! प्रदूषणामुळे सुद्धा पसरतो कोरोना, भयावह आहे रिसर्चमध्ये झालेला खळबळजनक खुलासा

by nagesh
Pollution And Coronavirus | scientists believe strong link between pollution and coronavirus and its proven

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाPollution And Coronavirus | जगात विध्वंस माजवणार्‍या Corona Virus वर शास्त्रज्ञांचे संशोधन अजूनही सुरू आहे. Journal of Exposure Science and Environmental Epidemiology मध्ये प्रकाशित नवीन रिसर्चमध्ये शास्त्रज्ञांच्या टीमने खुलासा केला आहे की कोरोना व्हायरस पसरण्यात प्रदूषण (Pollution And Coronavirus ) सुद्धा जबाबदार आहे. जेव्हा-जेव्हा प्रदूषण वाढले, या व्हायरसला (Pollution And Coronavirus ) सुद्धा आपले हात-पाय पसरण्यास संधी मिळाली.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

हा रिसर्च Desert Research Institute कडून करण्यात आला आहे. शास्त्रज्ञांच्या टीममध्ये सहभागी Daniel Kiser यांनी म्हटले की, रिसर्चमध्ये नेवाडाच्या रेनो परिसराचा समावेश करण्यात आला होता. जिथे कॅलिफोर्नियाच्या जंगलामध्ये आग लागल्याने खुप प्रदूषण पसरले होते.

 

 

जेव्हा येथे प्रदूषणाचा स्तर उच्च होता, तेव्हा कोरोनाचा पॉझिटिव्हीटी रेट सुद्धा वाढला. या परिसरात प्रदूषण वाढलेले असताना 18 टक्के जास्त कोरोना केस रिपोर्ट करण्यात आल्या.

 

 

धुर आणि प्रदूषणाने कोरोनाला मिळते मजबूती


Reno Gazette Journal सोबत बोलाताना डॅनियल कायजर यांनी सांगितले की,
यावेळी पश्चिम अमेरिकामध्ये 80 पेक्षा जास्त जंगलाच्या आगीच्या केस दिसून आल्या. यातून निर्माण झालेला धूर आणि प्रदूषण न्यूयॉर्कपर्यंत पोहचल्यानंतर कोरोनाच्या केस वाढल्या, त्यांनी आशा व्यक्त केली की या रिसर्चचे निष्कर्ष पाहिल्यानंतर लोक माहामरीविरूद्ध व्हॅक्सीनेशन करतील आणि मास्क घालून स्वताला व्हायरसपासून वाचवतील.

 

 

शास्त्रज्ञांनी Washoe County Health District and Renown Health कडून डेटा जमवला होता.
जंगलातील आगीच्या दरम्यान वातावरणात 2.5 मायक्रोमीटरपेक्षा सुद्धा छोटे पार्टीकल्स तरंगत होते.
शास्त्रज्ञांना या पार्टीकल्समध्ये नवीन प्रकारचा कोरोना व्हायरस मिळाला.

 

 

आर्द्रता आणि उष्णतेमुळे व्हायरस पसरला

या स्टडीमध्ये सहभागी University of California चे वायु प्रदूषण तज्ज्ञ विशेषज्ञ deofk Kent Pinkerton यांचे म्हणणे आहे की जास्त तापमान, आर्द्रता, वायु प्रदूषण, जलवायु परिवर्तन सारख्या गोष्टी COVID-19 च्या केसेस आणखी वाढवण्यास मदत करतात.
प्रदूषणाच्या छोट्या-छोट्या पार्टीकल्ससोबत कोरोना व्हायरसला श्वासाद्वारे शरीरात पोहचणे सोपे होते.

तुर्कीमध्ये सुद्धा यावर एक संशोधन झाले होते,
ज्यामध्ये वायू प्रदूषणासोबत कोरोनाचा संबंध दर्शवण्यात आला होता.
संशोधन सांगते की, जंगलातील आगीमुळे झालेल्या प्रदूषणामुळे कोरोनाच्या केस अमेरिकेत वाढल्या,
अशावेळी जगाच्या इतर भागात सुद्धा वायु प्रदूषणाने या डेडली व्हायरसला वाढण्याची संधी मिळेल.

 

 

Web Title :- Pollution And Coronavirus | scientists believe strong link between pollution and coronavirus and its proven

 

हे देखील वाचा :

Maharashtra Rain Alert | कोल्हापूर, रायगडसह रत्नागिरीवर पुन्हा मुसळधार पावसाचं संकट, पुण्यासह ‘या’ 6 जिल्हयांना ‘यलो अलर्ट’

Wakad Police | सराईत 3 वाहन चोरटे गजाआड, 2.5 लाखांच्या 7 दुचाकी जप्त

Assam-Mizoram Border Issue | आसाम-मिझोरामच्या सीमेवरील हिंसाचारात इंदापूरचे सुपूत्र वैभव निंबाळकर गंभीर जखमी

 

Related Posts