IMPIMP

Assam-Mizoram Border Issue | आसाम-मिझोरामच्या सीमेवरील हिंसाचारात इंदापूरचे सुपूत्र वैभव निंबाळकर गंभीर जखमी

by nagesh
Assam Mizoram Border Issue | pune district indapurs son vaibhav chandrakant nimbalkar sp kachhar assam injured in assam mizoram border issue

पुणे न्यूज (Pune News): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) Assam-Mizoram Border Issue | आसाम आणि मिझोराम या दोन्ही राज्यांतील वाद पेटला आहे. राज्यांच्या सीमांच्या कारणांवरून (Assam-Mizoram Border Issue) या दोन राज्यातील लोकांमध्ये जोरदार हिंसाचार उफाळला असल्याचं समोर आलं आहे. काल (सोमवारी) या सीमेवरील हिंसाचाराला (violence) रोखताना आसाम पोलिसांचे 6 जवान मृत्यू पावले. तर 50 पोलीस जखमी झाले आहेत. जखमींवर सिलचरच्या वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. मात्र, त्या जखमी झालेल्या पोलिसांमध्ये पुणे (Pune) जिल्ह्यातील इंदापूरच्या (Indapur) एका सुपूत्राचा देखील समावेश आहे. वैभव चंद्रकांत निंबाळकर (Vaibhav Chandrakant Nimbalkar) (मूळ रा. सणसर ता. इंदापूर जि. पुणे) असे त्याचे नाव आहे. सध्या निंबाळकर हे आसाम (Assam) राज्यातील कछार जिल्ह्याचे SP म्हणून कार्यरत आहेत. याबाबत माहिती राष्ट्रवादीच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी दिली आहे.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

सोमवारी (26 जुलै) रोजी जमावानं केलेल्या हल्ल्यात SP वैभव निंबाळकर हे देखील गंभीर जखमी झालेत. SP निंबाळकर लवकरात लवकर बरे व्हावेत, यासाठी खा. सुप्रिया सुळे यांनी सदिच्छा व्यक्त केली आहे.
तर, सध्या निंबाळकर यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, आसाम आणि मिझोराम राज्यामध्ये सीमेवरून मागील काही वर्षांपासून वाद सुरूच आहे.
यावर तोडगा अद्याप निघाला नाही. नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांनी ईशान्येकडील राज्यांच्या सर्व मुख्यमंत्र्यांची शिलॉंगमध्ये बैठक बोलावली होती.
बैठकीला 2 दिवस होण्याआधीच पुन्हा एकदा हिंसाचार पेटल्याचं पाहायला मिळालं.
या जमावाला आवर घालताना अनेक पोलीस जखमी (Police injured) झाले असून त्यामधील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

 

 

या दरम्यान, या दोन्ही राज्यातील सीमाभागात (At the border) राहणाऱ्या आठ शेतकऱ्यांच्या झोपड्यांना आग लागल्याच्या कारणावरून हा हिंसाचार पेटला आहे.
झोपडपट्याना अज्ञातांनी ही आग लावली असून त्याचा तपास सध्या पोलीस करीत आहेत.
परंतु, मुख्यतः म्हणजे मूळ सीमाप्रश्नाच्या वादात आगीचं एक कारण मिळालं आहे.

 

 

Web Tilte : Assam Mizoram Border Issue | pune district indapurs son vaibhav chandrakant nimbalkar sp kachhar assam injured in assam mizoram border issue

 

हे देखील वाचा :

Bank Holiday in August | ऑगस्ट महिन्यात 15 दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या सुट्ट्यांची यादी

Pune Crime | पैशाच्या वादातून 5 जणांच्या टोळक्याकडून तरूणावर खुनी हल्ला, हडपसरमधील ससाणे नगरमधील घटना

Sangli Crime News | पोराला भूतबाधा झाल्याने तो घरातल्यांना त्रास देतो ! बापानेच छाटले मुलाचे शिर, सांगोल्यातील तलावात मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलिसांनी केली कारवाई

 

Related Posts