IMPIMP

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची खास योजना ! महिन्याच्या किमान गुंतवणूकीत मिळतील तब्बल 35 लाख रुपये; जाणून घ्या

by nagesh
Post Office Scheme | these five schemes of post office which get the highest return double the money in a few years

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Post Office Scheme | अनेक गुंतवणूकदार गुंतवणूक (Investment and Return) करण्यासाठी योग्य मार्ग निवडत असतो. त्या गुंतवणूकीतून कमी परतावा मिळाला तरी चालेल पण धोका नसावा. असं मत गुंतवणूकदारांचं असतं. त्यामुळे गुंतवणुकदार सुरक्षित (safe investment) असलेल्या योजनांना प्राधान्य देतात. या सारख्या कमी जोखीम असणाऱ्या गुंतवणुकीचा मार्ग शोधत असाल, तर पोस्ट ऑफिसची एक खास योजना (Post Office Scheme) तुमच्या समोर आहे. ती म्हणजे भारतीय पोस्ट (Indian Post) विभागाची ग्राम सुरक्षा योजना (Gram Suraksha Yojana) होय. याबाबत जाणून घ्या.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

ग्राम सुरक्षा योजना (Gram Suraksha Yojana) हा गुंतवणुकीचा असाच एक चांगला मार्ग आहे. या योजनेमध्ये कमी धोका असतो. तसेच, गुंतवणुकदारांना चांगला परतावा देखील मिळू शकणार आहे. ग्राम सुरक्षा योजनेंतर्गत (safe investment) बोनससह विमा रक्कम वयाच्या 80 व्या वर्षी अथवा संबंधित ग्राहकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कायदेशीर वारसाला अथवा त्याने नामनिर्देशित केलेल्या व्यक्तीला मिळणार आहे.

 

नियम व अटी काय?
या योजनेत 19 ते 55 वयोगटातला कोणताही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो. या योजनेअंतर्गत किमान 10 हजार ते 10 लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. या योजनेचा प्रीमियम भरण्यासाठी मासिक, त्रैमासिक, सहामाही अथवा वार्षिक अशी सुविधा घेता येते. ग्राहकाला प्रीमियम भरण्यासाठी 30 दिवसांचा अतिरिक्त कालावधीही दिला जातो. पॉलिसी सुरू असताना हप्ते थकल्यास ग्राहक थकीत प्रीमियम भरून पॉलिसी पुन्हा सुरू करता येणार आहे. (Post Office Scheme)

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

कर्ज घेण्याची सुविधा काय असणार?
या योजनेअंतर्गत कर्जसुविधेचा देखील लाभ घेता येतो. हा लाभ पॉलिसी खरेदी केल्यानंतर 4 वर्षांनी मिळू शकतो. 3 वर्षांनंतर सरेंडर करता येते पॉलिसी ग्राहक 3 वर्षांनंतर पॉलिसी सरेंडर करू शकतो. पण, अशावेळी त्याला योजनेचा कोणताही लाभ मिळणार नाही. तसेच विशेष म्हणजे प्रति 1 हजार रुपयांना 65 रुपये प्रति वर्ष बोनस या योजनेअंतर्गत देण्याचं आश्वासन देण्यात आलंय.

लाभ काय –
एखाद्याने 19 वर्षांच्या वयात 10 लाखांची ग्रामसुरक्षा पॉलिसी घेतली,
तर 55 वर्षांसाठी मासिक प्रीमियम 1515 रुपये, 58 वर्षांसाठी 1463 रुपये आणि 60 वर्षांसाठी 1411 रुपये असणार आहे.
पॉलिसी खरेदीदाराला 55 वर्षांसाठी 31.60 लाख रुपये, 58 वर्षांसाठी 33.40 लाख रुपये मॅच्युरिटी लाभ मिळणार आहे.
60 वर्षांसाठी मॅच्युरिटी लाभ 34.60 लाख रुपये मिळणार आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

दरम्यान, या योजनेची माहिती मिळवण्यासाठी, आणि योजना घेतल्यानंतर नॉमिनी नाव अथवा ई-मेल आयडी आणि मोबाइल नंबर यांसारखे तपशील अपडेट करण्यासाठी जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये संपर्क साधता येणार आहे.
अधिक माहितीसाठी ग्राहक 1800 180 5232/155232 या टोल फ्री हेल्पलाइन क्रमांकावर किंवा www.postallifeinsurance.gov.in या अधिकृत वेबसाइटवर संपर्क साधू शकता.

 

Web Title :- Post Office Scheme | post office new sceme Gram Suraksha Yojana read in details

 

हे देखील वाचा :

International Civil Aviation | परदेशात जाणार्‍या प्रवाशांसाठी खुशखबर ! डिसेंबर अखेर पर्यंत सामान्य होईल आंतरराष्ट्रीय विमानसेवा

DGP Sanjay Pandey | संजय पांडे पोलीस महासंचालक पदासाठी अपात्र? राज्याला नवीन DGP मिळण्याची शक्यता

Local Body Elections | आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकात काँग्रेसचा स्वबळाचा नारा; आता राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष?

 

Related Posts