IMPIMP

PPF Account Merger Rules | दोन PPF खाते एकाच पीपीएफ अकाऊंटमध्ये विलीन करायची असतील तर जाणून घ्या नियम, येणार नाही कोणतीही अडचण

by nagesh
Changes In PPF | changes in ppf account rules major changes in public provident fund know before investment

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाPPF Account Merger Rules | पीपीएफ किंवा पब्लिक प्रॉव्हिंडंट फंड (Public Provident Fund) स्कीम अंतर्गत, व्यक्ती केवळ एक खाते उघडू शकतो. जेव्हा एखादा बचत करणारा एकापेक्षा जास्त पीपीएफ अकाऊंट उघडतो, त्यावेळी नंतरचे खाते अमान्य ठरवले जाते. परंतु, काही बाबतीत पीपीएफ सबस्क्रायबर्सची रिक्वेस्ट पाहता, काही सवलती दिल्या जातात. अर्थ मंत्रालय एकापेक्षा जास्त पीपीएफ खात्यांचे मर्जर (PPF Account Merger Rules) करून अशी अमान्य खाती वैध करते (how to merge two PPF accounts). जर एखादे पीपीएफ लोन अकाऊंट (PPF Loan Account) असेल तर ते मर्जर करण्यापूर्वी बंद करावे. म्हणजे कर्ज रक्कमेची परतफेड करावी लागेल.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

याबाबतीत स्वता निवडू शकता मुख्य खाते

 

दोन्ही पीपीएफ खात्यात केलेली बचत ठराविक कालावधीच्या आत असेल, तेव्हा खातेधारकाला आपल्या मर्जीनुसार खाते ठेवण्याचा पर्याय (PPF Account Merger Rules) मिळेल.
समान ऑपरेटिंग एजन्सीत सध्याच्या पीपीएफ अकाऊंटला एजन्सीच्या स्तरावर मर्जर केले जाऊ शकते.
यासाठी पीपीएफ अकाऊंट ट्रान्सफर (PPF Account Transfer) करण्याची प्रक्रिया करावी लागेल.

 

दोन ऑपरेटिंग एजन्सीमध्ये चर्चेची गरज

 

परंतु वेगवेगळ्या ऑपरेटिंग एजन्सीमधील पीपीएफ अकाऊंट मर्जर करण्यासाठी दोघांमध्ये चर्चेची गरज असेल.
अशा प्रकरणात खातेदाराला त्या अकाऊंट ऑफिसला मर्जरसाठी रिक्वेस्ट सबमिट करावी लागेल.
जिथे त्यास खाते कायम ठेवायचे आहे, ज्यासोबत अकाऊंटचे पासबुक किंवा स्टेटमेंट जमा करावे लागेल.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

वार्षिक सबस्क्रीप्शन पाहिले जाईल

 

यानंतर अकाऊंट ऑफिस केस दूसर्‍या अकाऊंट ऑफिसला पाठवेल आणि सर्व आर्थिक वर्षात सबस्क्रीप्शन डिटेल्स व्हेरिफाय करण्यास किंवा पाठवण्यास सांगेल.
अकाऊंट्स ऑफिस नंतर खातेधारकाद्वारे सर्व पीपीएफ अकाऊंटमध्ये जमा केलेले वार्षिक सबस्क्रीप्शन पाहिल.

 

…हे तपासले जाईल

 

हे पाहिले जाईल की, सबस्क्रीप्शन एखाद्या आर्थिक वर्षात जमाचे उल्लंघन करते किंवा नाही.
असे असेल तर अकाऊंट ऑफिस दुसर्‍या अकाऊंट ऑफिसला खाते बंद करणे आणि अकाऊंटमध्ये ठेवलेली रक्कम ट्रान्सफर करण्यासाठी सांगेल.

 

मर्जरनंतर अकाऊंट उघडल्याची तारीख कशी ठरेल?

 

जे अकाऊंट आता कायम राहील, त्याची उघडण्याची तारीख मॅच्युरिटी आणि इतर उद्देशांसाठी खरे अकाऊंट उघडण्याची तारीख मानली जाईल.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

तर रिफंड केले जाईल

 

जिथे दोन्ही अकाऊंटमध्ये जमा करण्यात आलेली रक्कम एकुण मिळून ठरवलेल्या रक्कमेच्या मर्यादेपेक्षा जास्त आहे.
तिथे मर्यादेपेक्षा जास्त रक्केला सबस्क्रायबर्सला त्या अकाऊंटमधून रिफंड केले जाईल, ज्याचे मर्जर करायचे आहे.

 

Web Title : PPF Account Merger Rules | public provident fund ppf account merger know rules and guidelines

 

हे देखील वाचा :

Pimpri Corona | दिलासादायक ! पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 36 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Multibagger stock | ‘या’ स्टॉकने गुंतवणुकदारांना केले मालामाल, 6 महिन्यात आली 105% तेजी; तुमच्याकडे आहे का?

Pune News | पुण्यातील तरुणीने परदेशी मैत्रिणींबरोबर इटलीत साजरी केली दिवाळी; फराळाचा घेतला आस्वाद

 

Related Posts