IMPIMP

Pimpri Corona | दिलासादायक ! पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 36 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pimpri Corona Updates | Anxiety increased More than 2000 new corona patients in Pimpri Chinchwad in last 24 hours find out other statistics

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचा (Pimpri Corona) प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. शहरामध्ये नव्याने (New patient) आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. तर बरे होणाऱ्या रुग्णांचे (Recover patient) प्रमाण वाढले आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona) 36 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 01 रुग्णांच्या मृत्यूची नोंद (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 36 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 76 हजार 440 इतकी झाली आहे. त्याचवेळी (Pimpri Corona) शहरामध्ये 33 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 72 हजार 212 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 

शहरात 466 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

शहरामध्ये सध्या 466 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शहरामध्ये मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे. आज दिवसभरात याआधी मृत्यू झालेल्या शहरातील एका रुग्णाचा मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात शहरातील एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4493 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

दिवसभरात 119 जणांचे लसीकरण

शुक्रवारी (दि.05) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 132 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले.
आज दिवसभरात 119 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहरामध्ये 23 लाख 46 हजार 135 जणांना लस देण्यात आली आहे.

 

Web Title :- Pimpri Corona | Comfortable! 36 new patients of ‘Corona’ in Pimpri Chinchwad, know other statistics

 

हे देखील वाचा :

Multibagger stock | ‘या’ स्टॉकने गुंतवणुकदारांना केले मालामाल, 6 महिन्यात आली 105% तेजी; तुमच्याकडे आहे का?

Pune News | पुण्यातील तरुणीने परदेशी मैत्रिणींबरोबर इटलीत साजरी केली दिवाळी; फराळाचा घेतला आस्वाद

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 54 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Related Posts