IMPIMP

Prateik Babbar | एका मुलाखतीत प्रतीक बब्बरने त्याच्या भूतकाळातील अनेक गोष्टींचा केला धक्कादायक खुलासा; म्हणाला…

by nagesh
Prateik Babbar | prateik babbar opens up about his past and uased to blame his mother for that

सरकारसत्ता ऑनलाईन टीम – ‘इंडिया लॉकडाऊन’ या चित्रपटांमुळे अभिनेता प्रतीक बब्बर (Prateik Babbar) हा चर्चेत आहे. सध्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी प्रतीक विविध कार्यक्रमात सहभाग नोंदवत आहे. तर एका कार्यक्रमात त्यानं मुलाखतीमध्ये अनेक गोष्टींचा खुलासा केला. जे ऐकून प्रेक्षकांनाही धक्का बसला आहे. यावेळी प्रतीक नशेच्या आहारी जाऊन त्याने त्याच्या आयुष्याची वाट लावली होती आणि या परिस्थितीला त्यानं त्याची आई दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांना जबाबदार धरले होते. (Prateik Babbar)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मुलाखतीमध्ये प्रतीक ने या चित्रपटामागील त्याच्या भावना व्यक्त केल्या. यावेळी प्रतीक म्हणाला, ‘इंडिया लॉकडाऊन’ हा चित्रपट मी केवळ माझ्या आईसाठी स्वीकारला आहे. कारण हा चित्रपट मातीतला चित्रपट आहे. आपल्या लोकांशी जोडलेला आहे. माझ्या आईचे देखील अनेक चित्रपट हे मातीशी जोडलेले होते आणि मला एक वेगळ्या पद्धतीने तिला श्रद्धांजली वाहायची होती. यासाठी मी हा चित्रपट स्वीकारला. अनेक वेळा माझी तुलना माझ्या आईशी केली जाते. अशा गोष्टीचं माझ्यावर दडपण येत पण उत्साह ही मिळतो आणि आत्मविश्वास ही वाढतो. मला नेहमी एका प्रतिभावंत अभिनेत्रीचा मुलगा म्हणून ओळखले जाते. याचा मला सार्थ अभिमान आहे.

 

माझ्यासाठी तिच्या अभिनयाच्या जवळपास जाणंही खूप मोठी गोष्ट आहे. मला खूप राग येतो माझ्या रागामुळेच मी माझे करिअर संपवले आहे. एवढेच नाही तर या रागामुळेच माझ्या आयुष्याची देखील मी वाट लावून ठेवली होती. पण आता माझा थोडासा राग कमी झाला आहे. माझे आजी आजोबा मला सोडून गेल्यापासून मी आपल्या मातीत आपल्या लोकांशी हळूहळू जोडलं गेलो”. (Prateik Babbar)

 

 

प्रतीक पुढे म्हणाला, “माझ्या रागामुळे मी खूप काही सहन केले आहे.
मला जास्त राग तेव्हा यायचा जेव्हा मला मार्गदर्शन करण्यासाठी कोणीच नसायचं मी कुठे चुकतो हे सांगायला माझी आई नाहीये.
मी काय करतोय याविषयी कोण बोलणार यावेळी मी आकाशाकडे एकटक बघत बसायचो आणि या सगळ्यासाठी जबाबदार तूच आहेस कारण तू माझ्यासोबत नव्हतीस असे मी आईला दोष द्यायचो.
माझं बालपण इतर मुलांप्रमाणे नव्हतं”. असेही प्रतीक ने सांगितले.
‘इंडिया लॉकडाऊन’ हा चित्रपट 2 डिसेंबर रोजी ‘झी 5’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन मधुर भांडारकर यांनी केले. या चित्रपटात प्रतीक बब्बरबरोबर सई ताम्हणकर,
श्वेता बासु प्रसाद, आहाना कुमरा आणि प्रकाश बेलवाडी या कलाकारांनी देखील काम केले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Prateik Babbar | prateik babbar opens up about his past and uased to blame his mother for that

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यातील नाना पेठेत सराईत गुन्हेगाराचा कोयत्याने वार करुन खून, मध्यरात्रीची घटना

Sanjay Raut On Disha Saliyan Case | दिशा सालियनचा दारूच्या नशेत 14 व्या मजल्यावरून तोल जाऊन खाली पडल्याने तिचा मृत्यू; प्रकरणाचा सीबीआय अहवाल समोर, संजय राऊतांचा नारायण राणेंवर हल्लाबोल

Pune Pimpri Crime | पूर्ववैमनस्यातून तरुणाचा कोयत्याने सपासप वार करुन खून, चाकणमधील शिवसेना भवन समोरील घटना

 

Related Posts