IMPIMP

Prof. Dr. Sanjay B. Chordiya | ‘सूर्यदत्त’चे प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांना राज्यपालांच्या हस्ते ‘सीएसआर अवॉर्ड-2023’ सन्मान प्रदान

by nagesh
Prof. Dr. Sanjay B. Chordiya | Suryadatta Education Foundation Prof. Dr. Sanjay B. Chordia awarded 'CSR Award-2023' by the Governor

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- Prof. Dr. Sanjay B. Chordiya | सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सर्वांसाठी सर्वांगीण शिक्षण हा ध्यास घेऊन
कार्यरत असलेल्या सूर्यदत्त एज्युकेशन फाऊंडेशन आणि बन्सी-रत्न चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया (Prof. Dr. Sanjay
B. Chordiya) यांना राज्यपाल रमेश बैस (Maharashtra Governor Ramesh Bais) यांच्या हस्ते ‘सीएसआर एक्सलन्स अवॉर्ड’ने (CSR Excellence
Awards) सन्मानित करण्यात आले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मुंबईतील राजभवनातील दरबार हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर (Adv Rahul Narwekar), हिंदुजा ग्रुपचे शोम हिंदुजा (Shom Hinduja) आदी उपस्थित होते. सीएसआर क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध संस्थांना राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. उद्योग व सामाजिक क्षेत्रातील २०० पेक्षा अधिक लोकांचा सहभाग होता. (Prof. Dr. Sanjay B. Chordiya)

 

समाजातील सर्व स्तरांतील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यासह गरीब व गरजू विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य करणे आणि कोणताही भेदभाव न करता त्यांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिल्याच्या, तसेच २००० पेक्षा अधिक नोकरदारांना उच्चशिक्षणासाठी ‘लर्न व्हईल अर्न’ अंतर्गत शिष्यवृत्ती, महिला, रेल्वे कुली, रिक्षा ड्रायवर, अशा आर्थिक मागास वर्गातील मुलामुलींना कौशल्य विकासाचे, इंग्रजी भाषा व सांगणकाचे प्रशिक्षण देत असल्याबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 

प्रा. डॉ. संजय चोरडिया यांच्यासह आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या (Birla Education Trust) डॉ. नीरजा बिर्ला (Dr. Neerja Birla), बजाज फाउंडेशनचे (Bajaj Foundation) अपूर्व बजाज (Apoorva Bajaj), गोदरेंज इंडस्ट्रीजचे नादीर गोदरेज (Nadir Godrej of Godrej Industries), फिनोलेक्स इंडस्ट्रीज (Finolex Industries) व मुकुल माधव फाउंडेशनचे (Mukul Madhav Foundation) विजय गुरुनानी (Vijay G. Gurnani), सुदर्शन केमिकल्सचे राजेश राठी (Rajesh Rathi – Sudarshan Chemical Industries Ltd), यांच्यासह भारतीय आयुर्विमा मंडळ, महिंद्रा ग्रुप, घोडावत ग्रुप, मालपाणी ग्रुप, कोहिनुर ग्रुप आदी संस्थांना सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून समाजकार्यात दिलेल्या भरीव योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-   Prof. Dr. Sanjay B. Chordiya | Suryadatta Education Foundation Prof. Dr. Sanjay B. Chordia awarded ‘CSR Award-2023’ by the Governor

 

हे देखील वाचा :

Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे पिंपरी-चिंचवड क्राईम न्यूज : महाळुंगे एमआयडीसी पोलिस स्टेशन – अल्पवयीन मुलीला बेशुध्द करून केले लैंगिक अत्याचार

Bribe Demand Case On Mahila Talathi | लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : 20 हजाराच्या लाच प्रकरणी महिला तलाठीविरूध्द अ‍ॅन्टी करप्शनकडून गुन्हा

Devendra Fadnavis | ‘मुख्यमंत्र्यांनी नगरविकासासाठी रेकॉर्डब्रेक निधी दिला, पण…’, देवेंद्र फडणवीसांनी महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या कार्यावर ठेवलं बोट

 

Related Posts