IMPIMP

Bribe Demand Case On Mahila Talathi | लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : 20 हजाराच्या लाच प्रकरणी महिला तलाठीविरूध्द अ‍ॅन्टी करप्शनकडून गुन्हा

by nagesh
ACB Trap News | Anti-corruption Bureau Nanded: Women sarpanch and gram sevak caught in anti-corruption net while fleeing after taking bribe

परभणी :सरकारसत्ता ऑनलाईन- Bribe Demand Case On Mahila Talathi | सातबारा उतार्‍यावर नाव लावून फेरफार नोंद करण्याच्या
कामांसाठी 20 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau Parbhani) परभणी
जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील रूमणा (जवळा) सज्जाच्या महिला तलाठ्याविरूध्द परभणी (Parbhani ACB Trap) येथील नवामोंढा पोलिस
स्टेशनमध्ये (New Mondha Police Station) गुन्हा दाखल केला आहे. (Bribe Demand Case On Mahila Talathi)

 

शिल्पा किशनराव घाटोळ असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिला तलाठयाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदाराच्या आईस न्यायालयाच्या आदेशाने त्यांची वडिलोपार्जित शेत जमिनीचा हिस्सा मिळाला आहे. त्या शेत जमिनीच्या सातबारा उतार्‍यावर नाव लावून फेरफार नोंद करण्याच्या कामांसाठी महिला तलाठी शिल्पा किशनराव घाटोळ यांनी तक्रारदाराकडे सरकारी पंचासमक्ष 20 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली (Parbhani Crime News). अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने शिल्पा घाटोळ यांच्याविरूध्द परभणी येथील नवामोंढा पोलिस ठाण्यात लाच मागणी प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. (Bribe Demand Case On Mahila Talathi)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

नांदेड परिक्षत्राचे पोलिस अधीक्षक राजकुमार शिंदे (ACB SP Rajkumar Shinde) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधीक्षक किरण बिडवे (DySP Kiran Bidve), पोलिस निरीक्षक सदानंद वाघमोरे (PI Sadanand Waghmare), पोलिस निरीक्षक बसवेश्वर जकीकोरे (Basaveshwar Jakikore), पोलिस हवालदार चंद्रशेखर निलपत्रेवार, मिलिंद हनुमंते, शेख मुख्तार, चालक हवालदार जनार्धन कदम यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक बसवेश्वर जकीकोरे करीत आहेत.

 

Web Title :  Bribe Demand Case On Mahila Talathi | Anti-corruption Bureau Parbhani : Anti-corruption case against female Talathi in case of bribe of 20 thousand

 

हे देखील वाचा :

Devendra Fadnavis | ‘मुख्यमंत्र्यांनी नगरविकासासाठी रेकॉर्डब्रेक निधी दिला, पण…’, देवेंद्र फडणवीसांनी महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या कार्यावर ठेवलं बोट

Rahul Narwekar | ‘आणखी सकारात्मक बदल होणार असतील तर…’, जपान दौऱ्यावरुन आलेल्या राहुल नार्वेकरांचे सूचक विधान

Pune Crime News | पुणे-सोमवार पेठ क्राईम न्यूज : समर्थ पोलिस स्टेशन – 9 टक्के मोबादला देण्याच्या आमिषाने 81 लाख 50 हजाराची फसवणूक

MNS Anil Shidore | राज्य सरकारच्या मराठी विषयाबाबतच्या ‘त्या’ निर्णयानंतर मनसेकडून कडाडून विरोध, म्हणाले…

 

Related Posts