IMPIMP

Property Tax Pune | पाच वर्षात पाणीपट्टी 100 टक्क्यांनी वाढली; परंतू पुणेकरांना अद्याप ‘चोवीस तास’ पाणी पुरवठा नाही; मिळकत करामध्ये 11 टक्के वाढीचा प्रशासनाचा प्रस्ताव

by nagesh
Pune PMC News | Strict enforcement of plastic bag ban! On the first day itself, PMC took action against 14 traders and seized 391 KG plastic bags Single Use Plastic Ban

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Property Tax Pune | पुणे शहरासाठीच्या चोवीस तास पाणी पुरवठा योजनेसाठी पुणेकरांच्या ‘पाणीपट्टी’ मध्ये मागील पाच वर्षात १०० टक्के वाढ झाली आहे. परंतू या योजनेचे काम अद्याप ४० टक्केदेखील झालेले नाही. दरम्यान आगामी आर्थिकवर्षापासून अर्थात २०२२-२३ पासून पाणीपट्टी मध्ये वाढ होणार नसली तरी प्रशासनाने मिळकत करातील (Property Tax Pune) अन्य करांमध्ये ११ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, स्थायी समिती (pune municipal corporation standing committee) व सर्वसाधारण सभेच्या (PMC General Body Meeting) निर्णयानंतरच ही वाढ लागू होणार आहे. (Pune Water Supply News)

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

शहराला चोवीस तास पाणी पुरवठा (Pune Water Supply News) करण्यासाठीच्या योजनेच्या कामाला २०१६ मध्ये सुरूवात झाली आहे. या योजनेअंतर्गत शहरात ८५ ठिकाणी टाक्या उभारण्यात येणार असून सुमारे १ हजार ६०० कि.मी.ची नव्याने पाईपलाईन आणि पाण्याचा वापर मोजण्यासाठी मीटर बसविण्यात येणार आहेत. मात्र, अद्याप बहुतांश टाक्यांची कामे प्रगतीपथावर असून पाईपलाईन व मीटरच्या कामांचीही तीच परिस्थिती आहे. विशेष असे की या योजनेला मान्यता देताना तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपने (BJP) पाणीपट्टीमध्ये वाढ करण्याचा तसेच योजना पुर्ण झाल्यानंतर मानकापेक्षा अधिक पाण्याच्या वापरावर मीटरनुसार बिल आकारणी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. (Property Tax Pune)

 

या प्रस्तावाच्या मान्यतेनंतर पहिल्यावर्षी पाणीपट्टीमध्ये २० टक्के व पुढील चारवर्षे दरवर्षी १५ टक्के याप्रमाणे वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार आतापर्यंंत शंभर टक्के वाढ करण्यात आली आहे. पुढील आर्थिक वर्षापासून पाणीपट्टीमध्ये वाढ केली जाणार नाही. मात्र, प्रशासनाने महापालिका आयुक्तांच्या (pmc commissioner pune) आगामी अंदाजपत्रकामध्ये उत्पन्नवाढीसाठी सर्वसाधारण कर, सफाई कर, साधारण जललाभ कर व मलनिस्सारण करामध्ये एकत्रित ११ टक्के वाढीचा निर्णय घेतला आहे. तसा प्रस्ताव लवकरच स्थायी समितीच्या माध्यमातून सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी ठेवण्यात येईल. सर्वसाधारण सभेच्या मान्यतेनंतरच त्याची अंमलबजावणी होईल. मात्र, आगामी महापालिका निवडणुकीच्या (pune municipal election) पार्श्‍वभूमीवर सत्ताधारी व विरोधकांकडूनही हा प्रस्ताव फेटाळला जाण्याचीच शक्यता अधिक आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

Web Title :- Property Tax Pune | In five years the water rate has increased by 100 per cent; But Pune residents still do not have a ‘twenty-four hour’ water supply; Administration proposes 11 per cent increase in property tax

 

हे देखील वाचा :

ST Workers Strike | संपकरी एसटी कामगारांना दणका ! मंत्री अनिल परब यांचं मोठं विधान

Pune Corporation | पुणे मनपाने मागीलवर्षीच्या उत्पन्नाचा आकडा यंदा डिसेंबरमध्येच गाठला ! मार्चअखेर पर्यंत 6500 कोटींचा टप्पा पार होईल – हेमंत रासने

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 38 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Related Posts