IMPIMP

Pune Corona | दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 93 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pune Corona | Diagnosis of 444 patients of Corona in Pune city in last 24 hours, find out other statistics

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी होत. मंगळवारी (दि.2) सायंकाळी चार वाजेपर्यंत शहरात 67 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. आजपर्यंत पुणे शहरात 5 लाख 04 हजार 397 पुणेकरांना कोरोनाची बाधा झाली आहे. आज शहरात 93 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 4 लाख 94 हजार 663 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. पुणे शहरात (Pune Corona) दैनंदिन रुग्णांच्या संख्येत घट झाली असून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे.

 

पुणे शहरामध्ये आजपर्यंत 35 लाख 60 हजार 320 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी 5 लाख 04 हजार 397 जण कोरोना बाधित (Corona-infected patients) आढळून आले आहे. यापैकी 9074 जणांचा मृत्यू झाला असला तरी, यातील बहुतांश रुग्ण हे इतर आजारांनी ग्रस्त होते. सध्या शहरामध्ये सक्रिय (Active patient) रुग्णसंख्या 660 इतकी आहे. (Pune Corona)

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने (Health Department of Pune Municipal Corporation) दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि.2) 67 नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. आज विविध तपासणी केंद्रावर 4 हजार 302 संशयितांची तपासणी करण्यात आली आहे. आज दिवसभरात पुण्याबाहेरील 05 जणांचा मृत्यू झाला असून शहरातील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झालेला नाही. शहरामध्ये 93 गंभीर रुग्ण असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 91 इतकी आहे.

 

Web Title : Pune Corona | Comfortable! 93 patients of ‘Corona’ discharged in Pune city in last 24 hours, find out other statistics

 

हे देखील वाचा :

Kirit Somaiya | किरीट सोमय्यांचा मोठा दावा, म्हणाले – ‘अनिल देशमुखांच्या अटकेनंतर आता पुढचा नंबर…’

Winter Tips | थंडीत गरम पाण्याने आंघोळ केल्याने होते नुकसान, ‘या’ 10 चूका करणे टाळा; जाणून घ्या

Gold Silver Price Today | धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर काय आहे सोन्या-चांदीचे दर? जाणून घ्या

 

Related Posts