IMPIMP

Pune Corona | दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 110 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pune Corona | Worrying ! The number of new corona patients in Pune city has reached 300 in the last 24 hours, find out other statistics

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  पुणे शहरामध्ये कोरोनाची (Pune Corona) दुसरी लाट ओसरत आहे. मागील काही दिवसांपासून पुणे शहरातील नवीन कोरोना (Pune Corona) रुग्णांची संख्या शंभरच्या आत आली आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने शहरात सक्रीय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 57 नवीन रुग्णांची (New patient) नोंद झाली आहे. तर 110 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.

 

पुणे शहरात आजपर्यंत 5 लाख 4 हजार 156 इतके कोरोना बाधित रुग्ण (Corona-infected patients) आढळून आले आहे.
त्यापैकी 4 लाख 94 हजार 290 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात शहराबाहेरील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
आतापर्यंत पुणे शहरात 9074 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

पुण्यात 792 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

 

पुणे शहरामध्ये सध्या 792 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत. यामध्ये 135 रुग्ण गंभीर आहेत. तर 109 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत.
आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 5493 स्वॅब (Swab) तपासणी करण्यात आली आहे.
आतापर्यंत 35 लाख 40 हजार 481 प्रयोगशाळा तपसणी करण्यात (Pune Corona) आली आहे.
अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (Health Department of Pune Municipal Corporation)

 

Web Title : Pune Corona | Comfortable! Discharge of 110 patients of ‘Corona’ in the last 24 hours in Pune city, know other statistics

 

हे देखील वाचा :

EPFO कडून ऐन दिवाळीत कर्मचार्‍यांच्या पदरी पुन्हा निराशा, PF वर पुन्हा जुनाच 8.5% व्याजदर कायम

PM Jan Dhan Yojana | PMJDY ला मिळतोय जबरदस्त प्रतिसाद, 44 कोटी झाली पीएम जनधन बँक अकाऊंटची संख्या

Chandrakant Patil | ‘क्रांती रेडकरच नाही तर मलाही बाळासाहेबांची आठवण येते’ – चंद्रकांत पाटील

 

Related Posts