IMPIMP

PM Jan Dhan Yojana | PMJDY ला मिळतोय जबरदस्त प्रतिसाद, 44 कोटी झाली पीएम जनधन बँक अकाऊंटची संख्या

by nagesh
JanDhan Account | jandhan account holders withdrawing 10000 rupees without minimum balance know how

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था–  PM Jan Dhan Yojana | केंद्र सरकारची पीएम जनधन योजना म्हणजे पीएमजेडीवाय (PM Jan Dhan Yojana) ला लोकांकडून पसंती मिळत आहे. पीएमजेडीवाय (PMJDY) अंतर्गत ऑक्टोबर 2021 पर्यंत 7 वर्षापेक्षा जास्त काळात बँक खात्यांची संख्या वाढून 44 कोटी झाली आहे, अशी माहिती अर्थ मंत्रालयाच्या (Finance Ministry) एका अधिकार्‍याने शुक्रवारी दिली.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2014 ला स्वातंत्र्य दिवसानिमित्त आपल्या संबोधनात या योजनेची घोषणा केली होती.
आर्थिक समावेशाला (Financial Inclusion) प्रोत्साहन देण्यासाठी 28 ऑगस्ट 2014 ला योजना सुरू केली होती.
हे राष्ट्रीय मिशन यासाठी सुरू केले होते कारण लोकांकडे बँक, पैसे पाठवण्याची सुविधा, कर्ज, विमा, पेन्शनसारख्या फायनान्शियल सर्व्हिस सहज
उपलब्ध व्हाव्यात.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

आर्थिक प्रकरणे विभागाच्या आर्थिक सल्लागार मनीषा सेन शर्मा यांनी इंडस्ट्री बॉडी एसोचॅम (Assocham) च्या एका कार्यक्रमात म्हटले की, पीएम जनधन योजनेला सुरूवातीपासून अमाप यश मिळाले आहे. ऑक्टोबर 2021 पर्यंत, जवळपास 44 कोटी लाभार्थी बँकांशी जोडले गेले.
या योजनेच्या माध्यमातून सरकारला लोकसंख्येच्या वंचित वर्गाकडून त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करून घेण्यात यश आले आहे.

 

Web Title : PM Jan Dhan Yojana | pm jan dhan yojna accounts swell to 44 crore till october this year

 

हे देखील वाचा :

Chandrakant Patil | ‘क्रांती रेडकरच नाही तर मलाही बाळासाहेबांची आठवण येते’ – चंद्रकांत पाटील

Maharashtra Rains | महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता; 5 जिल्ह्यांना ‘Alert’

Pune News | राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा भाजपवर घणाघात, भाजप नगरसेवक धनराज घोगरेंच्या प्रकरणावरून म्हणाले – ‘ही तर संघटीत गुन्हेगारी’ (व्हिडीओ)

 

Related Posts