IMPIMP

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 444 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pune Corona Update | In the last 24 hours, 867 patients of 'Corona' were discharged in Pune city, find out other statistics

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनपुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव वाढत आहे. काल पुण्यात 524 रुग्ण आडळून आले होते तर 36
ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आले होते. आज यामध्ये थोडी घट झाली आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये कोरोनाच्या (Pune Corona) 444 नवीन
रुग्णांची नोंद झाली आहे. तर 120 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे. रुग्ण वाढत असल्याने शहरातील सक्रिय रुग्णांची
संख्या अडीच हजाराच्या वर गेली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

शहरात आजपर्यंत 5 लाख 11 हजार 585 इतके कोरोना बाधित रुग्ण (Pune Corona) आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 99 हजार 629 इतके रुग्ण
बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात शहराबाहेरील एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9 हजार 118 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पुणे शहरामध्ये सध्या 2838 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 101 रुग्ण गंभीर आहेत. तर 81 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. आज दिवसभरात
शहरातील विविध केंद्रावर 6573 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. आतापर्यंत 38 लाख 86 हजार 060 तपासणी करण्यात आल्या आहेत. अशी
माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (PMC Health Department)

 

 

Web Title : Pune Corona | Diagnosis of 444 patients of Corona in Pune city in last 24 hours, find out other statistics

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar | कोरोनाची रूग्ण संख्या झपाट्यानं वाढत असल्यानं अजित पवारांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Pune Crime | तरुणी गर्भवती राहिल्यावर तरुणाचा लग्नाला नकार, पुण्यात तरुणाविरुद्ध FIR

Blood Sugar Myths And Facts | मधुमेहाच्या लोकांनी गोड का खाऊ नये? जाणून घ्या काय आहे सत्य…

 

Related Posts