IMPIMP

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे शंभरहून अधिक नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pune Corona Update | Great relief to the people of Pune The number of active patients of Corona is less than five hundred find out other statistics

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन पुण्यात कोरोना (Pune Corona) बाधित रुग्णांची संख्येत चढ उतार पहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण घटले आहे. आज (बुधवार) दुपारी चार वाजेपर्यंत शहरात 120 नवीन रुग्णांची (Pune Corona) नोंद झाली आहे. तर 80 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे. रुग्णांची संख्या वाढली असली तरी शहरात आज एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. त्यामुळे हा मोठा दिलासा आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

पुणे शहरात (Pune Corona) गेल्या 24 तासात 6 हजार 229 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये 120 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आजपर्यंत शहरात 37 लाख 68 हजार 300 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये 5 लाख 7 हजार 919 जणांना कोरोनाची बाधा (Corona-infected patients) झाली आहे. त्यापैकी 4 लाख 98 हजार 031 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

 

शहरामध्ये सध्या 779 रुग्ण सक्रिय (Active patient) असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
पुणे शहरात रुग्णाच्या मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे.
गेल्या 24 तासात शहरातील एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही.
आजपर्यंत पुणे शहरातील 9 हजार 109 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सध्या शहरात 85 रुग्ण गंभीर आहेत. तर 56 रुग्ण ऑक्सिजनसह उपचार घेत आहेत.

 

Web Title :- Pune Corona | Over 100 new corona patients in Pune city in last 24 hours, find out other statistics

 

हे देखील वाचा :

Leena Nair | एकेकाळी ट्रेनी असलेल्या भारतीय वंशाच्या लीना नायर बनणार फ्रान्सच्या सर्वात मोट्या कंपनीच्या सीईओ

IPS Rashmi Shukla | फोन टॅपिंग प्रकरणी आयपीएस रश्मी शुक्लांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली

Rajkummar Rao | राजकुमार रावच्या नवीन नवरीने बिकमीमध्ये केली मस्ती, तर राजकुमार रावने…

 

Related Posts