IMPIMP

Maharashtra Police | दुर्दैवी ! शारीरिक कसरती करताना 27 वर्षीय पोलिसाचा मृत्यू; इंदापूर तालुक्यातील डिकसळ गावावर शोककळा

by nagesh
Pune Crime News | Chandannagar Police Station - Police constable rapes woman by showing fear of implicating her son and husband in a false crime, police constable accused of extorting 1 lakh by threatening defamation by implicating her in the crime of rape

पुणे :   सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Police | शारीरिक कसरती करताना पोलिस जवानाचा दुर्दैवी मृत्यू (Died) झाला आहे. ठाणे पोलीस
शहर दलात (Thane City Police) कार्यरत असलेले महेश मच्छिंद्र मोरे Mahesh Machhindra More (वय 27) असं त्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव
आहे. गुरुवारी (3 फेब्रुवारी) रोजी पहाटे शारीरिक कसरतीसाठी गेले असताना निधन झालं आहे. या दुर्दैवी निधनाने डिकसळ (Diksal) गावावर शोककळा पसरली आहे. (Maharashtra Police)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

महेश मोरे हे पुणे जिल्ह्यातील (Pune News) इंदापूर तालुक्यातील डिकसळ या गावचे होते. महेश खडतर परिश्रम करून ठाणे शहर पोलीस दलात 2014 साली दाखल झाले. ठाणे शहर पोलीस दलातील क्वीक रिस्पॉन्स टीममध्ये कमांडो म्हणून ते कार्यरत होते. दरम्यान, गुरुवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास महेश साकेत येथील पोलीस मैदानात (Police Grounds) शारीरिक कसरती साठी गेले असताना कसरती दरम्यान खाली कोसळले. तेथील उपस्थितांनी त्यांना उपचारासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात (Chhatrapati Shivaji Maharaj Hospital) दाखल केले. मात्र रुग्णालयात जाण्यापुर्वीच त्यांचा मृत्यु झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. (Maharashtra Police)

 

दरम्यान, शवविच्छेदन केल्यानंतर महेश यांच्या पार्थिवाला ठाणे शहर मुख्यालयात पोलीस आयुक्त जयवंत सिंह (Commissioner of Police Jaywant Singh) यांनी शासकीय इतमात मानवंदना दिली. गुरुवारी संध्याकाळी 9.30 वाजता महेश यांच्या पुण्यातील डिकसळ या मुळ गावी पुणे ग्रामीणच्या पोलीस (Pune Rural Police) जवानांनी बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना दिली. त्यानंतर शासकीय इतमामात पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

Web Title :- Maharashtra Police | tragic death policeman mahesh more while performing physical exercise indapur of pune

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्याच्या गुन्हे शाखेकडून मोठा शस्त्रसाठा जप्त ! माधव वाघाटे खून प्रकरणातील सराईत गुन्हेगारासह दोघांना अटक

Central Railway News | जालना, मनमान, अमरावती, नागपूर, नांदेडच्या प्रवाशांनो कृपया लक्ष द्या ! विशेष पॉवर ब्लॉकमुळे 10 गाड्या रद्द

Sara Ali Khan Viral Video | सारा अली खाननं बिकिनी घालून स्पॉर्ट गर्ल सोबत केली विचित्र हरकत, व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी केलं चांगलच ट्रोल

Valentine’s Week 2022 | लवकरच येतोय ‘व्हॅलेंटाईन वीक’ ! जाणून घ्या Rose Day पासून Valentine’s Day पर्यंतची पूर्ण लिस्ट

 

Related Posts