IMPIMP

Pune Corona | चिंताजनक! पुण्यातील ‘कोरोना’च्या रुग्णसंख्येत मोठी वाढ ! गेल्या 24 तासात तब्बल 2757 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pune Corona Update | In the last 24 hours, 867 patients of 'Corona' were discharged in Pune city, find out other statistics

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनपुण्यात कोरोना बाधित (Pune Corona) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंता वाढत आहे. दैनंदिन आढळून येणाऱ्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 9 हजारांवर पोहोचली आहे.त्यातच ओमिक्रॉनचे (Omycron Variant) रुग्ण आढळून येत असल्याने चिंता अधिक वाढली आहे. आज दिवसभरात 18 हजार 086 संशयितांची तपासणी करण्यात आली. यामध्ये तब्बल 2757 जणांचा कोरोना (Pune Corona) रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तर 628 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पुण्यात आजपर्यंत 5 लाख 19 हजार 535 रुग्ण (Pune Corona) आढळून आले आहेत. तर 5 लाख 616 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे शहरातील 2 तर शहराबाहेरील 4 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत शहरात 9 हजार 124 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पुणे शहराचा पॉझिटिव्हिटी रेट 7.71 टक्के आहे.

 

पुणे शहरात रुग्णांची संख्या वाढत असल्याने अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या वाढली आहे. पुणे शहरामध्ये सध्या 9792 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत,अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (PMC Health Department)

 

रुग्ण संख्येचा वाढता आलेख

1 जानवेरी – 399 रुग्ण
2 जानेवारी – 524 रुग्ण
3 जानेवारी – 444 रुग्ण
4 जानेवारी – 1104 रुग्ण
5 जानेवारी – 1805 रुग्ण
6 जानेवारी – 2284 रुग्ण
7 जानेवारी – 2757 रुग्ण

 

 

Web Title :- Pune Corona | Worrying! Big increase in the number of patients of ‘Corona’ in Pune! As many as 2757 new patients in the last 24 hours, find out other statistics

 

हे देखील वाचा :

Gold Price Today | आज पुन्हा घसरले सोने; चांदीही उतरली, कुणीही विचार केला नसेल इतक्या घसरणीचा, जाणून घ्या आजचा दर

Amruta Fadnavis | अमृता फडणवीसांचा विद्या चव्हाणांवर अब्रुनुकसानीचा दावा दाखल

PPF Limit Hike | PPF अकाऊंट होल्डर्ससाठी खुशखबर ! गुंतवणुकीची मर्यादा होऊ शकते दुप्पट

 

Related Posts