IMPIMP

Pune Crime | 45 वर्षीय ‘चाचा’कडून 12 वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार

by nagesh
Pune Minor Girl Rape Case | Abusing a minor girl with threat of defamation; Incidents in Yerawada area

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | एका 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलावर एका व्यक्तीने लैंगिक अत्याचार (Sexual Harassment) केल्याचा धक्कादायक प्रकार पुणे जिल्ह्यात (Pune Crime) उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे ऑनलाईन चॅटरुम (Online Chatroom) आणि मेसेंजर ॲपच्या (Messenger App) माध्यमातून या दोघांची ओळख झाली होती. पीडित मुलाच्या आईने याबाबत भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात (Bhosari MIDC Police Station) तक्रार दिली असून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पीडित मुलाच्या आईच्या तक्रारीवरुन 45 वर्षे वयाच्या ‘चाचा’ नावाच्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आपली खोटी ओळख सांगून ऑनलाइन चॅटिंग करणाऱ्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. एफआयआरमधील माहितीनुसार, ‘चाचा’ अशी फेक ओळख सांगत या आरोपीने 8 मार्च रोजी मेसेंजर मोबाईल ॲपच्या माध्यमातून मुलाशी संपर्क साधला. त्यानंतर 9 मार्च रोजी आरोपी ‘चाचा’ या अल्पवयीन मुलाला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेला. यावेळी त्या मुलाचे आई – वडील घरी नसल्याचा फायदा घेत आरोपीने मुलावर लैंगिक अत्याचार केला. (Pune Crime)

 

दरम्यान, या घटनेची माहिती कळताच पीडित मुलाच्या पालकांनी पोलिसांमध्ये धाव घेतली आणि संबंधित ‘चाचा’ विरोधात सोमवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला आहे. भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे (Senior Inspector of Police Shivaji Gaware) यांनी ही माहिती दिली. याप्रकरणी पॉक्सो ॲक्ट (POCSO Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title :- Pune Crime | 12 year old boy sexually abused by man Bhosari MIDC Police Station

 

हे देखील वाचा :

IPL 2022 | …म्हणून MNS ने फोडल्या आयपीएलच्या बसेस; जाणून घ्या प्रकरण

Thackeray Government | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! भाजपचा ‘हा’ नेता येणार अडचणीत ?

Brain Health Tips | तीष्ण बुद्धीसाठी आवश्य खा ‘हे’ 6 फूड्स ! जाणून घ्या कोणते

 

Related Posts