IMPIMP

Pune Crime | घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना हडपसर पोलिसांकडून अटक; 13 लाखाचा मुद्देमाल जप्त

by nagesh
Pune Police | Woman safely home after 12 years from abroad, commendable performance of Pune Police

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | पुणे शहरामध्ये बंद घराचे कडी कोयंडे तोडून घरातील सोन्याचे दागिने (Gold Jewelry) चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारांना हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) अटक (Arrest) केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून 7 गुन्हे उघडकीस आणून गुन्ह्यातील 13 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच पोलिसांनी चोरीचा मुद्देमाल विकत घेणाऱ्या सोनराकडून सोन्याचे आणि चांदीचे दागिने (Silver Jewelry) जप्त (Pune Crime) केले आहेत.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

अर्जुन अशोक पाटील Arjun Ashok Patil (वय -31 रा. स.नं 106, महाकाली मंदीराशेजारी, गोसावी वस्ती, हडपसर, पुणे), विजय सुभाष देशमाने Vijay Subhash Deshmane (रा. मु.पो. राऊतवाडी, बुलढाणा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत अनिलकुमार जग्गाराव बेदालम Anilkumar Jaggarao Bedalam (रा. स्वप्नपुर्ती सोसायटी, हडपसर, पुणे) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिलकुमार बेदालम हे 10 फेब्रुवारी रोजी कुटुंबासह बालाजी दर्शनासाठी गेले होते. ते घरी आले असता त्यांच्या घरातून दागिने चोरीला गेल्याचे दिसून आले. त्यांनी याची माहिती हडपसर पोलिसांना दिली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

 

हडपसर पोलीस ठाण्यातील तपास पथकाकडून या गुन्ह्याचा तपास तांत्रिक विश्लेषणातून (Technical Analysis) केला जात असताना तपास पथकाचे पोलीस अंमलदार शशिकांत नाळे (Shashikant Nala), निखील पवार (Nikhil Pawar) व सचिन जाधव (Sachin Jadhav) यांना मिळालेल्या माहितीच्या हडपसर पोलीसांनी आरोपी अर्जुन अशोक पाटील याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली. चौकशी दरम्यान त्याने त्याचा साथीदार आकाश लाकरे याच्या मदतीने हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहा ठिकाणी घरफोडी केल्याचे कबुल केले. पोलिसांनी त्याच्याकडून 7 लाख 15 हजार रुपये किंमतीचे 165 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

दरम्यान, हडपसर येथील काळेपडळ परिसरातील केतकेश्वर कॉलनीमध्ये उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश करुन चोरट्यांनी घरातील दागिने चोरी केल्याची घटना घडली होती. याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट 5 (Crime Branch Unit 5) ने आरोपी विजय देशमाने याला पकडून हडपसर पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच चोरलेले सोने सोनार अक्षय श्रीनीवास दिक्षीत Akshay Srinivas Dixit (वय-25 रा. विश्वकर्मा पतसंस्था शेजारी सर्वे नंबर १११/१३/ब ओमकार कॉलनी, विजयनगर काळेवाडी पिंपरी, पुणे) याला दिल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी सोनार अक्षय दिक्षीत याच्याकडून 6 लाख 3 हजार 500 रुपये किमतीचे 120 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि 35 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने जप्त केले.

 

हडपसर पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कारवाईमध्ये दोघांना अटक करुन सात गुन्हे उघडकीस आणले आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 13 लाख 18 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाण (Addl CP Namdev Chavan),
पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 नम्रता पाटील (DCP Namrata Patil), सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई (ACP Bajrang Desai),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे (Senior Police Inspector Arvind Gokule),
पोलीस निरीक्षक (गुन्हे) दिगंबर शिंदे (Police Inspector Digambar Shinde),
पोलीस निरीक्षक गुन्हे विश्वास डगळे (Police Inspector Vishwas Dagle)
याच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे (API Vijaykumar Shinde),
पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे (PSI Avinash Shinde), पोलीस अमलदार, प्रदीप सोनवणे, अविनाश गोसावी,
संदीप राठोड, समीर पांडुळे शशिकांत नाळे, सचिन जाधव, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ निखील पवार,
प्रशान टोणपे रियाज शेख, सचिन गोरखे सुरज कुमार यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Pune Crime | burglars arrested by Hadapsar police; 13 lakh worth of property confiscated

 

हे देखील वाचा :

Pune Crime | सासरच्यांनी केलेल्या मारहाणीत विवाहितेच्या वडिलांचा मृत्यू, चौघांना अटक

Natural Mouth Fresheners | श्वासाची दुर्गंधी येतेय, तर या 4 नॅचरल माऊथ फ्रेशनरचा करा वापर

Pune Crime | पुणे शहरात रिक्षा चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला शिवाजीनगर पोलिसांकडून अटक

 

Related Posts