IMPIMP

Pune Crime | घरफोडी व वाहनचोरी करणारा सराईत गुन्हेगार विमानतळ पोलिसांकडून गजाआड, 2 लाखांचा मुद्देमाल जप्त

by nagesh
Pune Crime | Criminals robbed the couple in the Bopadev ghat, attacked them with a sword and looted their mobile and Mangalsutra

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | पुण्यात वाहन चोरी (Vehicle theft) आणि घरफोडी (Burglary in Pune) करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला (criminal) विमानतळ पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सापळा रचून अटक केली आहे. आरोपीने विमानतळ पोलीस ठाण्याच्या (Viman Nagar Police Station) हद्दीत केलेल्या घरफोडी आणि वाहन चोरीचे गुन्हे (Pune Crime) उघडकीस आले आहेत. पोलिसांनी आरोपीकडून 6 दुचाकी आणि घरफोडीच्या गुन्ह्यातील दागिने (Jewelry) असा एकूण 2 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई म्हाडा कॉलनी जवळ केली.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

टारझनसिंग चंदासिंग भोंड (वय-22 रा, गल्ली नं. 10 पाटील इस्टेट झोपडपट्टी, जुना पुणे मुंबई रोड, शिवाजीनगर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोहगाव (Lohgaon) येथील खंडोबामाळ येथील घरफोडीच्या गुन्ह्यातील (Pune Crime) आरोपीचा शोध घेत असताना पोलीस नाईक अंकुश जोगदंड (Ankush Jogdand) यांना घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी म्हाड कॉलनी जवळ असल्याची माहिती मिळाली.

 

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांना सापळा रचून आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीदरम्यान त्याने लोहगाव येथील घरफोडीच्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलीस कोठडी (police custody) दरम्यान केलेल्या चौकशीत आरोपी घरफोडी करण्यासाठी दुचाकीचा वापर करत असल्याची माहिती समोर आली. दुचाकीबाबत चौकशी केली असता विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चार आणि पिंपरी (Pimpri Police Station) व भोसरी पोलीस ठाण्याच्या (Bhosari police station) हद्दीतून प्रत्येकी एक अशा एकूण सहा दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडून 6 दुचाकी आणि दागिने जप्त केले आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाण (Addl CP Namdev Chavan),
पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 रोहिदास पवार (DCP Rohidas Pawar), सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव (ACP Kishor Jadhav),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव (Senior Inspector of Police Bharat Jadhav),
पोलीस निरीक्षक गुन्हे मंगेश जगताप (Police Inspector Mangesh Jagtap)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अविनाश शेवाळे (PSI Avinash Shewale),
सहायक पोलीस फौजदार गणेश साळुंखे, पोलीस हवालदार रमेश लोहकरे, पोलीस नाईक सचिन जाधव, रुपेश पिसाळ,
अंकुश जोगदंडे, गिरीश नानेकर, विनोद महाजन, शिवराज चव्हाण, हारुण पठाण, नाना कर्चे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | burglary and vehicle theft case: 2 lakh seized from Viman Nagar Police Station

 

हे देखील वाचा :

Omicron Covid Variant | 1 नोव्हेंबरनंतर पुण्यात प्रवाशांची तपासणी करण्याचे महापालिकेला आदेश

Priyanka Nick Anniversary | निक जोनस आणि प्रियंका चोपराने सेलिब्रेट केली त्यांची तिसरी Anniversary, रोमँटीक व्हिडीओ आला समोर

Delhi Government | DL-RC सह RTO संबंधीत ‘या’ कामांचा कालावधी वाढला, जाणून घ्या आता कोणत्या तारखेपर्यंत बनवू शकता Learning License

 

Related Posts