IMPIMP

Pune Crime | सराईत गुन्हेगार समीर शबीर शेख व त्याच्या साथीदारावर CP अमिताभ गुप्तांची ‘मोक्का’ कारवाई

by nagesh
Pune Crime | MPDA Action On Criminal of Hadapsar CP Amitabh Gupta

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनपुणे शहरातील गुन्हेगारावर (Pune Crime) आळा घालण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांच्याकडून गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई (MCOCA Action) Mokka करण्यात येत आहे. पुण्यातील (Pune Crime) विमानतळ पोलीस ठाण्याच्या (Vimantal Police Station) हद्दीत दहशत पसरवणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपी समीर शबीर शेख व त्याच्या साथीदारावर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. आयुक्तांनी आजपर्यंत 72 टोळ्यांवर मोक्का कारवाई केली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

समीर शबीर शेख (वय – 27) व त्याचा साथिदार शकिल शबीर शेख (वय – 27 दोघे रा. एकता नगर येरवडा) यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. आरोपींची विमानतळ, येरवडा (Yerawada Police Station), चंदननगर पोलीस स्टेशनच्या (Chandan Nagar Police Station) हद्दीत दहशत आहे. आरोपींविरुद्ध शरीराविरुद्ध तसेच मालमत्तेविरुद्ध गुन्हे दाखल आहेत. या टोळीने अवैध मार्गाने आर्थिक प्राप्तीसाठी आपले गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व व परिसरात दहशत पसरवण्यासाठी खुनाचा प्रयत्न (Attempted Murder), जबरी चोरी (Robbery), मारामारी, घातक शस्त्र बाळगणे, दुखापत, घरफोडी अशी गंभीर गुन्हे केले आहेत. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई (Preventive Action) करण्यात आली होती. मात्र त्यांच्यामध्ये काहीच फरक पडला नाही.

 

 

गुन्हेगारी टोळीला आळा घालण्यासाठी विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव (Senior Police Inspector Bharat Jadhav) यांनी मोक्का अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार केला. पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 रोहिदास पवार (DCP Rohidas Pawar) यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाण (Addi CP Namdev Chavan) यांच्याकडे प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावाला अपर पोलीस आयुक्तांनी मंजूरी दिल्याने आरोपींविरुद्ध मोक्काची कारवाई करण्यात आली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

आयुक्तांची 72 वी मोक्का कारवाई
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे शहर पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्विकारल्यानंतर गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर पावलं उचलली आहेत. शरिराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणाऱ्या व लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू वर्षात 9 तर आजपर्यंत 72 गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 रोहिदास पवार, सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव (ACP Kishore Jadhav)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, पोलीस निरीक्षक गुन्हे मंगेश जगताप (Police Inspector Mangesh Jagtap),
पोलीस उप निरीक्षक एस. ए. जाधव (PSI S. A. Jadhav), सर्वेलन्स पथकातील पोलीस हवालदार उमेश धेंडे, पोलीस नाईक पीसाळ, सुर्या यादव, महिला पोलीस अंमलदार धुमाळ यांच्या पथकाने केली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Pune Crime | CP Amitabh Guptas MCOCA action against pune criminal Sameer Shabir Shaikh and his accomplice

 

हे देखील वाचा :

Multibagger Stock | 35 पैशाच्या पेनी स्टाॅकने केलं मालामाल ! 6 महिन्यात 1 लाखांचे 17 कोटी; तुमच्याकडे आहे ‘हा’ शेअर?

Anti Corruption Bureau (ACB) Jalgaon | दीड हजार रुपयांची लाच घेताना कृषी सहाय्यक अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

Jay Pawar With Actress Urvashi Rautela | शरद पवारांच्या नातवाचा बॉलिवूडमधील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीसोबतचा फोटो व्हायरल

 

Related Posts