IMPIMP

Pune Crime | अकाऊंटंटला दिला ‘एक्सेस’ अन् त्याने घातला 63 लाखांना गंडा; पुण्याच्या मार्केटयार्डमधील घटना

by nagesh
Pune Crime News | Pune Crime News : Lonikand Police Station - Fraud of a senior citizen by using fake purchase documents on the pretext of renting a place

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | मार्केटयार्ड (Marketyard News) मधील धान्य बाजारातील एका दुकानात अकाऊंटंट म्हणून काम करणाऱ्याला सोयीसाठी म्हणून मालकाने बँक खात्याचा एक्सेस दिला. त्याचा त्याने गैरफायदा घेत खात्यातून आपल्या खात्यात पैसे ट्रान्सफर करुन ६३ लाख २९ हजार ९४१ रुपयांना गंडा (Cheating Case) घातल्याचे उघड (Pune Crime) झाले आहे.

याप्रकरणी सचिन सुरेश गादिया Sachin Suresh Gadia (वय ४४, रा. बिबवेवाडी) यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात (Marketyard Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी उपेशकुमार रामदुलारे परदेशी Upeshkumar Ramdulare Pardeshi (वय २७, रा. निंबाळकर वस्ती, खोपडेनगर, कात्रज – Katraj) याला अटक केली आहे. हा प्रकार एप्रिल २०१८ ते २६ एप्रिल २०२१ दरम्यान घडला.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गादिया यांचे मार्केटयार्डमध्ये धान्य गाळा आहे. त्यांच्या पुजा साहित्य होलसेल विक्रीच्या दुकानात उपेशकुमार हा अकाऊंटंट म्हणून काम करत होता. त्याला फिर्यादी यांनी विश्वासाने बँक खात्याचा अ‍ॅक्सेस दिला होता. या कालावधीत त्याने या अ‍ॅक्सेसचा गैरफायदा घेऊन बँक खात्यातील (Bank Account) पैसे पेटीएम, अ‍ॅमेझॉन (amazon), बीलडेक्स (Billdesk), रोझरपे मर्चंटद्वारे (Razorpay Merchant) स्वत:च्या पेटीएम खात्यावर (Paytm Account) घेऊन फसवणूक (fraud case) केली. लेखा परीक्षणाच्या दरम्यान हा प्रकार उघड झाल्यावर त्यांनी सायबर पोलिसांकडे (Pune Cyber Police) तक्रार दिली होती. त्यात त्याने ६३ लाख २९ हजार ९४१ रुपयांची फसवणूक केल्याचे उघउ (Pune Crime) झाले. पोलीस निरीक्षक ढमढेरे (Police Inspector Dhamdhere) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | fraud case against accountant for cost Rs 63 lakh; Incident at Marketyard, Pune

 

हे देखील वाचा :

Gold Silver Price Today | सोने झाले स्वस्त, चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेट सोन्याचा दर

Bullock Cart Race In Maharashtra | महाराष्ट्रात पुन्हा एकदा भिर्र..भिर्र..! मात्र ‘या’ अटीशर्ती पाळाव्या लागणार

IT Refund | इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने 13 डिसेंबरपर्यंत टॅक्सपेयर्सला पाठवले 1.36 लाख कोटी रुपये, ‘या’ पध्दतीनं तपासा रिफंड स्टेटस

 

Related Posts