IMPIMP

Bullock Cart Race In Maharashtra | महाराष्ट्रात पुन्हा एकदा भिर्र..भिर्र..! मात्र ‘या’ अटीशर्ती पाळाव्या लागणार

by nagesh
Bullock Cart Race Pune | camera captures the moment of madhukar pachputes horse riding in his seventies

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सर्वोच्च न्यायालयात बैलगाडा शर्यती (Bullock Cart Race In Maharashtra) बाबत सुनावणी झाली. यामध्ये बैलगाडा शर्यतीला (Bullock Cart Race In Maharashtra) सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) काही अटी आणि नियम घालून परवानगी दिली आहे. तसेच हे प्रकरण पाच खंडपीठाकडे जाणार आहे. संपूर्ण राज्याचे बैलगाडा शर्यतीच्या सुनावणीकडे लक्ष लागले होते. महाराष्ट्रात पुन्हा शर्यतीचा धुरळा उडणार आहे. आज (गुरुवार) तीन न्यायाधीशांच्या बेंचसमोर सुनावणी झाली. यामध्ये न्यायाधीश अजय खानविलकर (Judge Ajay Khanwilkar), न्यायाधीश सी टी रविकुमार (Judge C T Ravikumar), न्यायाधीश दिनेश माहेश्वरी (Judge Dinesh Maheshwari) यांचा समावेश होता.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

काय असतील अटी?

– या निकालानंतर हे प्रकरण घटनापीठाकडे जाणार आहे. त्यामुळे अर्धी लढाई राज्यानं जिंकली.

– कोर्टानं घालून दिलेल्या निर्देशांचे पालन करुन शर्यती आयोजनाला परवानगी

– बैलगाडा शर्यतींसाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागेल

– शर्यतीबाबत जिल्हाधिकाऱ्यांना माहिती द्यावी लागणार

– शर्यतीदरम्यान बैलांना क्रूरपणे वागणूक देता येणार नाही

– राज्य सरकारनं केलेल्या नियमावलीचे पालन करावे लागेल

 

त्रिसदस्यीय पीठासमोर सुनावणी

बैलगाडा शर्यतीबाबत (Bullock Cart Race) सुप्रीम कोर्टात त्रिसदस्यीय पीठासमोर सुनावणी पार पडली. राज्य सरकारच्या वतीनी मुकुल रोहतगी (Mukul Rohatgi) यांनी आज युक्तिवाद केला. बैल हा धावणारा प्राणी आहे की नाही याबाबत राज्य सरकारने (State Government) स्थापन केलेल्या सत्यशोधन समितीच्या अहवालाद्वारे त्यांनी काही मुद्दे मांडले. त्यानंतर पेटा (PETA) या संस्थेच्या वतीने बैल हा धावू शकणारा प्राणी नाही, बैलाचे पोट मोठे आहे. त्यामुळे तो धावू शकत नाही असा युक्तिवाद पेटाचे वकील अॅड. ग्रोव्हर (Adv. Grover) यांनी केला. (Bullock Cart Race In Maharashtra)

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

घोडा-बैलांवरील अत्याचार थांबावेत म्हणून एकाच गाडीला घोडा-बैल जुंपण्यास बंदी होती. शर्यतीत बैलांना चाबकानं, मोठ्या काठीनं अमानुष मारणे, बॅटरीचा शॉक देणं, टोकदार खिळे लावणं, अशा अनेक प्रकारे अत्याचार केले जातात, असे सांगत प्राणीमित्रांनी शर्यतीवर बंदी घालण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने प्राण्यांवर कोणतेही अत्याचार होणार नाहीत, या अटीवर बैलगाडा शर्यतींना परवानगी दिली आहे.

 

Web Title :- Bullock Cart Race In Maharashtra | bullock cart race important hearing in supreme court bailgada sharyat guidelines maharashtra

 

हे देखील वाचा :

IT Refund | इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने 13 डिसेंबरपर्यंत टॅक्सपेयर्सला पाठवले 1.36 लाख कोटी रुपये, ‘या’ पध्दतीनं तपासा रिफंड स्टेटस

BJP-MNS Alliance | पुणे महापालिकेसाठी भाजप-मनसे युती नाही?, राज ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका

Pune Crime | मित्र पत्नीसोबत ‘मज्जा’ मारायचे अन् पतीला मिळायचं ‘सुख’ आणि मिळायचा ‘आनंद’, पुण्याच्या बारामतीमधील धक्कादायक घटना; जाणून घ्या भयावह स्टोरी

Related Posts