IMPIMP

Pune Crime | पुण्यात खंडणी मागितल्याची तक्रार केल्याच्या रागातून भरदिवसा व्यावसायिकावर सपासप वार

by nagesh
Pune Crime | Demand for physical contact from ! Suicide of a young woman due to defamation, incident in Vimannagar area

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन व्यवसायिकाला जीवे मारण्याची धमकी (Death threat) देऊन पाच लाखाची खंडणीची (ransom) मागणी केल्याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली होती. पोलिसांकडे खंडणी मागितल्याची तक्रार केल्याच्या रागातून खंडणीखोरांच्या साथिदारांनी एका व्यवसायिकावर भरदिवसा सपासप वार केल्याची घटना पुण्यात (Pune Crime) घडली आहे. ही घटना पुण्यातील (Pune Crime) लष्कर पोलीस ठाण्याच्या (lashkar police station) हद्दीत सोमवारी (दि.1) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

सलीम करमाली शिवानी Salim Karmali Shivani (रा. शास्त्रीनगर, पुणे) असे या घटनेत गंभीर जखमी झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी सलीम यांचे महात्मा गांधी रस्त्यावर (Mahatma Gandhi Road) चप्पल, बुट विक्रीचे दुकान आहे. त्यांना 29 ऑक्टोबर रोजी काही गुन्हेगारांनी येरवडा येथील टर्फ क्बल (Turf Cable Yerawada) परिसरात बोलावून घेतले. त्याठिकाणी सल्लाउद्दीन शेख (Sallauddin Sheikh) व त्याच्या साथीदारांनी सलीम यांना 24 तासात 5 लाख रुपये खंडणी दे, नाहीतर गोळ्या घालून मारुन टाकण्याची धमकी (Pune Crime) देत खंडणी मागितली.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

यानंतर सलिम यांनी पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge) यांच्याकडे तक्रार अर्ज केला होता.
दरम्यान, सोमवारी सलीम हे नेहमीप्रमाणे त्यांचे दुकान उघडून काही कामानिमित्त घरी चालले होते.
व्हिक्टरी चित्रपटगृहामागील (Victory Cinema) गल्लीत लावलेली दुचाकी काढत
असताना दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले.
या घटनेत सलिम शिवानी हे जखमी झाले असून
त्यांनी लष्कर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध तक्रार (Pune Crime) दिली आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला आहे.

 

Web Title :- Pune Crime | In Pune, a businessman was attacked all day long out of anger over a ransom demand

 

हे देखील वाचा :

Nawab Malik | ‘है तैयार हम’ ! ‘फडणवीसांनी शरद पवारांऐवजी मुंबई पोलिसांकडे पुरावे द्यावे’

Chandrakant Patil | ‘सरकार तुमचं असताना अन्याय-अन्याय म्हणून का ओरडायचं?’

ESIC Recruitment 2021 | नोकरीची सुवर्णसंधी ! कर्मचारी राज्य विमा महामंडळ पुणे इथे भरती; पगार 1,31,000 रुपये

 

Related Posts