IMPIMP

Nawab Malik | ‘है तैयार हम’ ! ‘फडणवीसांनी शरद पवारांऐवजी मुंबई पोलिसांकडे पुरावे द्यावे’

by nagesh
Nawab Malik | nawab malik drugs allegation devendra fadnavis should give evidence mumbai police instead sharad pawar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन –  राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते नवाब मलिक यांनी आज सकाळी ट्विट करुन माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप (Nawab Malik) केले. अमृता फडणवीस (Amrita Fadnavis) यांचा फोटो ट्विट करत ड्रग्स पेडलर्सशी संबंध असल्याचा आणि महाराष्ट्रातील ड्रग्स व्यवसायाचे मास्टरमाईंड (Drugs business mastermind) असल्याचा आरोप (Nawab Malik) मलिक यांनी केला होता. परंतु, फडणवीस यांनी मलिकांचा हा आरोप फेटाळला आहे. तसेच मलिक यांचेच अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे पुरावे आपण दिवाळीनंतर शरद पवार यांना देणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. यावरुन आता प्रतिक्रिया येत आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या इशाऱ्याला नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘है तैयार हम’ असे केवळ तीन शब्दांचे ट्विट मलिक यांनी केले आहे.
त्यामुळे ऐन दिवाळीमध्ये फडणवीस आणि मलिक यांच्यामध्ये राजकीय जुगलबंदी रंगण्याची शक्यता आहे.
तर, फडणवीस यांच्या आरोपानंतर उद्योजक आणि विश्लेषक तहसीन पुनावाला (tehseen poonawalla) यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

 

 

 

 

नबाव मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत, तर दिवाळीची वाट पाहण्याऐवजी किंवा शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे तक्रार करण्याऐवजी,
फडणवीस यांनी मुंबई पोलिसांकडेच (Mumbai Police) पुरावे सादर करणे त्यांचे कर्तव्य आहे, असे तहसीन पुनावाला यांनी म्हटले आहे.
तसेच सहाजिकच ते केवळ बडबड करत आहेत, असे ट्विट पुनावाला यांनी केले आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

 

 

नवाब मलिक काय म्हणाले ?

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांच्या पत्नीने अमृता यांनी एक गाणं गायलं होतं. नदी संरक्षण अभियानासाठी ‘रिव्हर साँग’ बनललं होतं.
त्यात सोनु निगम (Sonu Nigam) आणि अमृता यांनी गाणं गायलं होते. तर त्यात देवेंद्र फडणवीस यांनी अभिनय केला होता.
या गाण्याला जयदीप राणा (Jaideep Rana) यांनी अर्थसहाय्य पुरवलं होतं. राणा हे ड्रग्स पेडरल आहेत.
देवेंद्र फडणवीस व जयदीप राणा यांचे घनिष्ठ संबंध आहेत.
गणपती दर्शनाच्या वेळी देवेंद्र फडणवीस व जयदीप राणा एकत्र आहेत. तसेच फोटोही आहेत.
हे प्रकरण राज्यातील ड्रग्स व्यवसायासंबंधित आहे, असा गौप्यस्फोट नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला आहे.

 

 

 

Web Title:  Nawab Malik | nawab malik drugs allegation devendra fadnavis should give evidence mumbai police instead sharad pawar

 

हे देखील वाचा :

Chandrakant Patil | ‘सरकार तुमचं असताना अन्याय-अन्याय म्हणून का ओरडायचं?’

ESIC Recruitment 2021 | नोकरीची सुवर्णसंधी ! कर्मचारी राज्य विमा महामंडळ पुणे इथे भरती; पगार 1,31,000 रुपये

Pune Crime | फिर्यादीच निघाला आरोपी ! अपघाताचा बनाव अन् 40 लाखाची दारु लुटण्याचा प्रयत्न फसला

 

Related Posts