IMPIMP

Pune Crime News | वीजेचा धक्का लागून मुलाच्या मृत्यु प्रकरणी महावितरणच्या अभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल

by nagesh
Pune Crime News | Kothrud Police Station: One killed, another critically injured due to electrocution from high voltage power line

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | उच्च दाब वीज वाहिनीबाबत (High Pressure Power Line) सुरक्षा न घेतल्याने तिचा धक्का लागून एका १४ वर्षाच्या मुलाच्या मृत्यु प्रकरणी महावितरणच्या कात्रज विभागाचे अभियंत्याविरुद्ध (Engineer Of Mahavitaran Katraj) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शिवलिंग शरणप्पा बोरे (Shivling Sharanappa Bore) असे गुन्हा दाखल झालेल्या अभियंत्याचे नाव आहे. ही घटना कात्रज कोंढवा रोडवरील (Katraj Kondhwa Road) बलकवडे नगर येथील ओमकार सोसायटी येथे २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता घडली होती. याबाबत मंजुनाथ पुजारी (वय ५७, रा. कर्वेनगर) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३३/२३) दिली आहे. ऋषिकेश मंजुनाथ पुजारी (वय १४) असे मृत्यु पावलेल्या मुलाचे नाव आहे. (Pune Crime News)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज कोंढवा रोडवरील ओमकार सोसायटीतील गार्डनमध्ये महावितरणची उच्च दाब वाहिनी जमिनीपासून ४ फुटावर लोंबकळत होती.
याबाबत अनेकदा तक्रारी करण्यात आल्यानंतरही त्याची महावितरणकडून दखल घेण्यात आली नाही.
मंजुनाथ पुजारी हे कामानिमित्त कात्रजला आले होते. त्यांचा मुलगाही बरोबर आला होता.
ऋषिकेश हा नववी मध्ये शिकत होता. शाळेला सुट्टी असल्याने तो वडिलांबरोबर आला होता.
खेळत असताना चेंडू गार्डनमध्ये गेल्याने तो आणण्यासाठी तिकडे ऋषिकेश गेला.
त्यावेळी त्याला या वीज वाहिनीचा धक्का बसून त्यात तो भाजला. त्यात तो ६० टक्के भाजला होता़.
सुमारे ७ दिवसांच्या उपचारानंतर त्याचा ३० ऑक्टोबर रोजी मृत्यु झाला होता. भारती विद्यापीठ पोलिसांनी अकस्मात मृत्यु अशी नोंद केली होती. वीजेच्या वाहिनीचा धक्का लागून त्यात ऋषिकेश पुजारी याचा मृत्युस कारणीभूत झाल्याप्रकरणी अभियंत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक थोरात तपास करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime News | A case has been registered against the engineer of Mahavitaran in the death of a child due to electric shock

 

हे देखील वाचा :

MLA Bacchu Kadu | आमदार बच्चू कडूंची प्रकृती खालावली, अमरावतीमधून नागपूरला केलं शिफ्ट
Maharashtra Govt Job | महापालिका, नगरपरिषदांमध्ये लवकरच 40 हजार पदांची भरती

Cabinet Incentive Scheme | भीम अ‍ॅप आणि रूपे डेबिट कार्डसाठी मोदी सरकारची भरीव तरतूद

 

Related Posts