IMPIMP

Pune Crime News | शिवीगाळ करुन महिलेसोबत गैरवर्तन, लोहगाव मधील कॅफेतील प्रकार

by sachinsitapure
Molestation Case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | कॅफेमध्ये कॉफी पित असताना महिलेचा हात पकडून तिच्या सोबत गैरवर्तन केले. तसेच शिवीगाळ करुन बघून घेण्याची धमकी दिली. हा प्रकार लोहगाव येथील पोरवाल रोडवरील कॅफे कॉफी पिक (Cafe Coffee Pick) येथे शुक्रवारी (दि.8) दुपारी सव्वा बाराच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याबाबत 36 वर्षीय महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) फिर्य़ाद दिली आहे. यावरुन ध्रुव सक्सेना (वय-27 पूर्ण नाव पत्ता माहित नाही) याच्यावर आयपीसी 354, 354ड, 504, 506 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्य़ादी यांच्या ओळखीचा आहे. शुक्रवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास
महिला पोरवाल रोडवरील (Porwal Road Lohegaon) कॅफे कॉफ पिक येथे कॉफी पित लॅपटॉपवर ऑफिसचे काम
करत होत्या. त्यावेळी आरोपी त्याठिकाणी अचानकपणे आला. त्याने फिर्य़ादी यांचा हात पकडून गैरवर्तन करुन
विनयभंग (Molestation Case) केला. त्यावेळी महिलेने त्यांचा हात सोडवून घेतला असता आरोपीने शिवीगाळ
करुन बघून घेण्याची धमकी दिल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Related Posts