IMPIMP

Devendra Fadnavis | ‘उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत’, देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान

by nagesh
 Devendra Fadnavis | who exactly told you that oppose barsu refinery devendra fadnavis question to uddhav thackeray

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा (Maharashtra Politics Crisis) निकाल अद्याप लागलेला नाही. सुप्रीम कोर्टात
(Supreme Court) सुनावणी पूर्ण झाली आहे. मात्र, न्यायमूर्तींनी निकाल राखून ठेवला आहे. शिंदे गटाच्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार
असल्याचा दावा केला जात आहे. मागील काही दिवसांपासून घडत असलेल्या राजकीय घडामोडींची चर्चा सुरु असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
(Devendra Fadnavis) यांनी मोठा दावा केला आहे. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हेच मुख्यमंत्री राहतील. उद्धव ठाकरे (Uddhav
Thackeray) पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत, असा दावा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मुंबईत एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीबाबत बोलताना म्हणाले, आजचे माझे भाकीत सांगतो की, एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील. त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातच (Maharashtra Politics News) आम्ही निवडणुकांना सामोरे जाऊ. त्यामुळे हे सरकार स्थिर आहे. या सरकारमध्ये कुठलाही बदल होणार नाही. एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील, असे फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले.

 

 

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार नाहीत

उद्धव ठाकरे आता पुन्हा मुख्यमंत्री होणं अशक्य आहे. ज्यांनी सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी पाहिली आहे त्यांच्या हे लक्षात आले असेल की उद्धव ठाकरे हे बहुमत चाचणीला (Majority Test) सामोरे गेले नाहीत. त्यांचे सरकार पुन्हा येणार नाही. मी वकील आहे. हे सांगू शकतो की उद्धव ठाकरेंनी राजीनामा (Resignation) दिल्यानंतरच सर्वोच्च न्यायालय हे त्यांना परत आणून बसवणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत अंदाज बांधणे योग्य राहणार नाही. जी आमची भूमिका आहे त्यामुळे असे वाटते की निकाल योग्य पद्धतीने लागेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

 

 

काँग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदार संपर्कात

काँग्रेस (Congress)- राष्ट्रवादीचे (NCP MLA) काही आमदार आमच्या संपर्कात असून योग्य वेळी त्यांचा पक्षप्रवेश होईल. तसेच आमदार नेहमीच संपर्कात असतात. सत्ताधारी पक्ष म्हणून काम करताना अनेकांशी संबंध निर्माण झाला आहे. या संबंधामुळे आणि आत्मविश्वासामुळे अनेक लोक बरोबर येतात. त्यामुळे आमच्या संपर्कात अनेक जण आहेत, त्यातील किती भाजपात (BJP) येतील ये आज निश्चित सांगता येणार नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

तर राज्याचं राजकारण स्वच्छ होईल

यावेळी बोलताना त्यांनी राजकीय नेत्यांकडून होत असलेल्या बेताल वक्तव्यांवर भाष्य केलं. हा सर्व प्रकार थांबवायचा असेल तर यासाठी एक चांगला उपाय आहे. पण यासाठी माध्यमांनी जबाबदारी घेतली पाहिजे. माध्यमांशी रोज सकाळी संजय राऊतांकडे (Sanjay Raut) जाणं बंद करावं. त्यामुळे ही समस्या निर्माण होते. जर तुम्ही त्यांच्याकडे जाणं बंद केलं तर तुम्हाला राज्याचं राजकारण स्वच्छ झालेलं दिसेल, असं फडणवीस म्हणाले.

 

 

Web Title :-  Devendra Fadnavis | bjp dcm devendra fadnavis claims that it is impossible for uddhav thackeray to become chief minister again

 

हे देखील वाचा :

Pune Collector Dr. Rajesh Deshmukh Marathi | मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी सर्व विभागांनी अधिक प्रयत्न करावेत – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

Dr Babasaheb Ambedkar Jayanti | वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ‘भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय चित्रपट’ चित्रप्रदर्शन आयोजित

Chandrakant Patil | पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शिरुर तालुक्यातील 329 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनांचे उद्घाटन

MLA Sanjay Gaikwad | ‘ठाकरे कुटुंबानं बालिशपणासारखी वक्तव्य करु नयेत’, आमदार संजय गायकवाड यांचा सल्ला

 

Related Posts