IMPIMP

Pune Crime News | जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी पुण्यातील माजी नगरसेवकावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा

by nagesh
Pune Crime News | Atrocity case against former corporator Ganesh Dhore in Hadapsar Police Station Pune for caste abuse

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | जातीवाचक शिवीगाळ केल्यापक्ररणी पुण्यातील एका माजी नगरसेवकाविरूध्द हडपसर पोलिस स्टेशनमध्ये (Hadapsar Police Station) अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये (Atrocity Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश बाळासाहेब ढोरे Ganesh Balasaheb Dhore (35, रा. फुरसुंगी रस्ता, भेकराईनगर, पुणे – Bhekrai Nagar Fursungi) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या माजी नगरसेवकाचे नाव आहे. (Pune Crime News)

प्रभागात केलेल्या कामाची तक्रार केल्याच्या रागातून जीतीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार (अ‍ॅट्रॉसिटी) हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याप्रकरणी सागर पोट्रे Sagar Potre (26, रा. पापडे वस्ती, फुरसुंगी) आणि प्रणव ढमाले Pranav Dhamale (26, रा. भेकराईनगर) यांच्याविरूध्द देखील मारहाण आणि जिवे मारण्याची धमकी (Death Threats) दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

याबाबत अधिक माहिती अशी की, गणेश ढोरे (Former Corporator Ganesh Dhore) हे फुरसुंगी परिसरातील माजी नगरसेवक आहेत. त्यांनी केलेल्या बेकायदेशीर कारभाराबाबत कोणीतरी पत्रकाराने तक्रार केली होती. त्यानंतर ढोरे यांनी फिर्यादीच्या घरी जाऊन त्यास जातीवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर फिर्यादीने पोलिस आयुक्तांकडे तक्रार अर्ज केला होता. त्याचा राग मनात ठेवुन गणेश ढोरे यांनी पोट्रे आणि ढमाले यांना सांगुन तक्रारदारास मारहाण केली होती.

सदरील गुन्हा हा कोंढवा पोलिस स्टेशन (Kondhwa Police Station)
येथुन हडपसर पोलिस स्टेशनकडे वर्ग करण्यात आला आहे.
गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस आयुक्त अश्विनी राख
(ACP Ashwini Rakh) करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | Atrocity case against former corporator Ganesh Dhore in
Hadapsar Police Station Pune for caste abuse

Related Posts