IMPIMP

Pune Police Crime Branch | रिक्षा चालकास बेदम मारहाण करून लुटणार्‍यांना गुन्हे शाखेकडून अटक

by nagesh
Arrest

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन –  Pune Police Crime Branch | लोहगाव स्मशानभुमी (Lohgaon Cemetery) जवळच्या परिसरातुन जाणार्‍या रिक्षा चालकास (Rickshaw Driver) काठीने आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून त्याच्याच रिक्षात जबरदस्तीने बसुन शहरात इतरत्र फिरून पुन्हा त्यास मारहाण करून त्याच्याकडील रिक्षा आणि इतर ऐवज आपल्या ताब्यात घेऊन पोबारा करणार्‍या दोघांना पुणे शहर पोलिसांच्या (Pune City Police) गुन्हे शाखेतील युनिट-4 ने अटक केली आहे. (Pune Police Crime Branch)

राहुल राजु थोरात Rahul Raju Thorat (28, रा. विश्वराज हॉस्पिटल समोर, लोणी-काळभोर, पुणे) आणि अजिंक्य प्रकाश मोहिते Ajinkya Prakash Mohite (28, रा. पवार वस्ती, शिवराज कॉलनी, लोहगांव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचे साथीदार बबल्या उर्फ अजय अशोक कसबे Bablya alias Ajay Ashok Kasbe (रा. वडार वस्ती, विश्रांतवाडी, पुणे) आणि अरूण राजु पिल्ले Arun Raju Pille (रा. संतनगर, लोहगांव, पुणे) हे अद्याप फरार आहेत. अटक आरोपी हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार (Criminals On Pune Police Record) असुन त्यांच्यावर यापुर्वी देखील गंभीर गुन्हे नोंद आहेत. ते सध्या जामिनावर बाहेर (Pune Criminals On Bail) आले. (Pune Police Crime Branch)

अटक आणि फरार आरोपींनी दि. 13 जून 2023 रोजी लोहगांव स्मशानभुमी जवळील परिसरात एका रिक्षा चालकास बेदम मारहाण करून त्याच्याकडील रिक्षा, मोबाईल आणि इतर ऐवज लुटला होता (Robbery In Pune). त्यासंदर्भात विमानतळ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. सदरील गुन्हयाचा तपासासाठी गुन्हे शाखेतील युनिट-4 चे पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. परिसरात सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) तपासले. दरम्यान, दि. 17 जून 2023 रोजी सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास जाधव, पोलिस अंमलदार संजय आढारी, प्रविण भालचिम, विनोद महाजन आणि नागेशसिंग कँुवर यांना रिक्षा चालकास लुटणार्‍या अजिंक्य मोहिते आणि राहुल थोरात यांची माहिती मिळाली. ते लोहगाव ते खराडी रोडवरील फॉरेस्ट पार्क जवळील नाल्याच्या शेजारी चोरलेल्या रिक्षात बसले असल्याचे समजले. त्यांनी सदरील माहिती वरिष्ठांना सांगितले. वरिष्ठांनी कायदेशीर कारवाईचे आदेश दिले.

पोलिसांनी सापळा रचुन राहुल थोरात आणि अजिंक्य मोहिते यांना अटक केली.
त्यांच्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर त्यांनी सदरील गुन्हा हा बबल्या उर्फ अजय आणि
अरूण पिल्ले यांच्या मदतीने केल्याचे कबुल केले. पोलिसांनी चोरलेली रिक्षा आणि इतर ऐवज जप्त केला आहे.

सदरील कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar),
सह पोलिस आयुक्त संदपि कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale),
पोलिस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende),
सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर (ACP Satish Govekar), पोलिस निरीक्षक गणेश माने (PI Ganesh Mane) यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास जाधव (API Vikas Jadhav), सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक महेंद्र पवार (ASI Mahendra Pawar), पोलिस अंमलदार संजय आढारी, प्रविण भालचिम, विनोद महाजन आणि नागेशसिंग कँुवर यांच्या पथकाने केली आहे.

Web Title : Pune Police Crime Branch | Police Arrested Rahul Raju Thorat & Ajinkya Prakash
Mohite In Robbery
Case Of Rickshaw Driver In Lohegaon

Related Posts