IMPIMP

Pune Crime News | बिबवेवाडी : पोलीस असल्याची बतावणी करीत महिलेला लुटले; पावणेचार लाखांचे दागिने पळविले

by nagesh
Pune Crime News | Bibvewadi: Woman robbed by pretending to be police; Jewels worth fifty four lakhs were stolen

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   Pune Crime News | पुढे पोलीस आहेत, तुम्ही अंगावरील दागिने काढून ठेवा, असे सांगून महिलेने दागिने काढले
असता ते घेऊन दोन चोरटे पळून गेले. (Pune Crime News)

 

याप्रकरणी धनकवडी येथील एका ५९ वर्षाच्या महिलेने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात (Bibvewadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ७९/२३) दिली
आहे. हा प्रकार लोअर इंदिरानगर येथील बिबवेवाडी समोरुन महेश सोसायटीकडे जाणार्‍या रस्त्यावर रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या पायी जात असताना एक जण त्यांच्याजवळ आला.
त्याने पुढे पोलीस आहेत, तुम्ही अंगावरील दागिने काढून ठेवा, असे म्हणाला.
त्यावर फिर्यादी यांनी त्यांच्या गळ्यातील ३ लाख ८५ हजार रुपयांचे ७७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र काढत होत्या.
तेव्हा चोरट्याने फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र जबरदस्तीने हिसकावून ते
साथीदाराच्या मोटारसायकलवरुन पळून गेले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जाधव (Senior Police Inspector Jadhav) तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime News | Bibvewadi: Woman robbed by pretending to be police; Jewels worth fifty four lakhs were stolen

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | कोंढवा : चौकशी करणार्‍या बीट मार्शल पोलिसांना मारहाण करणार्‍या तिघांना अटक

Pune Crime News | दत्तवाडी : 8 वर्षाच्या मुलावर दोन महिन्यांपासून अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या तिघांना अटक

Pune PMC News | महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे उच्चांकी उत्पन्न; मागील आर्थिक वर्षात १४९ कोटी २९ लाखांची वसुली

 

Related Posts