Pune PMC News | महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे उच्चांकी उत्पन्न; मागील आर्थिक वर्षात १४९ कोटी २९ लाखांची वसुली

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- मिळकतकर आणि बांधकाम विभागापाठोपाठ महापालिकेच्या (Pune PMC News) पाणी पुरवठा विभागाने (Water
Supply Department (PMC) देखिल नुकतेच संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये उच्चांकी उत्पन्न वसुल केले आहे. २०२२- २३ या आर्थिक वर्षामध्ये पाणी
पुरवठा विभागाला तब्बल १४९ कोटी २९ लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. (Pune PMC News)
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
वर्षभरा साठी केलेले नियोजन, स्वतंत्र निर्माण करण्यात आलेला मीटर सेल, शासकीय कार्यालयात केलेला सततचा पाठपुरावा, नळजोड तोडण्याच्या केलेल्या मोठ्या कारवाया, अभियंते आणि मीटर रीडर यांनी केलेले प्रामाणिक प्रयत्न, इत्यादी मुळे हे शक्य झालेले आहे.
मागील दोन वर्षांपूर्वीच्या उत्पन्नाचा विचार करता, खात्याने तब्बल ५० कोटी रुपये अधिक उत्पन्न मिळाले आहे,
अशी माहिती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता अनिरूद्ध पावसकर (Aniruddha Pavaskar) यांनी दिली.
ते म्हणाले, मागील आर्थिक वर्षामध्ये ज्या संस्थाकडून थकबाकी वसुल करण्यात आली त्यामध्ये खडकी ऍम्युनेशन फॅक्टरी,
गॅरीसन इंजिनिअर्स, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड, ससून रुग्णालय, जहांगीर नर्सिंग होम, येरवडा जेल, मेंटल हॉस्पिटल,
जेल प्रेस या प्रमुख शासकिय संस्थांच्या थकबाकीचाही समावेश आहे. (Pune PMC News)
Web Title :- Pune PMC News | High Income of Municipal Water Supply Department; 149 Crore 29 Lakhs in the last financial year
Comments are closed.