IMPIMP

Pune Crime News | राज्य उत्पादन शुल्क विभागाची पुण्यात मोठी कारवाई, विदेशी मद्यासह 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त

जनावरांच्या खाद्यासोबत विदेशी मद्याची तस्करी, दोघांना अटक

by sachinsitapure
State Excise Department Pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाने (State Excise Department Pune) मोठी कारवाई केली आहे. जनावरांच्या खाद्यासोबत भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याची (Foreign Liquor) तस्करी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एक कोटी 19 लाख 92 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी (दि.1) दुपारी चारच्या सुमारास बंगलोर-मुंबई महामार्गावर (Bangalore-Mumbai Highway) रावेत गावच्या हद्दीत केली आहे. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

बंगलोर-मुंबई महामार्गावरुन विदेशी मद्याची तस्करी होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक चरणसिंग राजपुत यांना मिळाली. त्यानुसार, रावेत गावच्या हद्दीतील हॉटेल हेमराज समोर सापळा रचण्यात आला. पथकाने दुपारी चारच्या सुमारास भारत बेझ कंपनीचे (Bharat Benz Company) 14 चाकी वाहन (एमएच 15 एफव्ही 7940) आडवले.

वाहनामध्ये 50 किलो वजनाचे जनावराचे खाद्य भरलेले 80 पोती आढळून आली. या पोत्यांच्या खाली गोवा राज्य निर्मीत आणि केवळ गोवा राज्यात विक्रीसाठी आणलेला विदेशी मद्याचे बॉक्स आढळून आले. या कारवाईत 750 मि.ली. क्षमतेच्या प्रत्येक बॉक्समध्ये 12 बाटल्या या प्रमाणे 431 बॉक्स (5,172 बाटल्या), 180 मिली क्षमतेच्या प्रत्येक बॉक्समध्ये 48 बाटल्या याप्रमाणे 785 बॉक्स (37,680 बाटल्या) तसेच 500 मिली क्षमतेच्या किंगफिशर बिअरचे 40 बॉक्स (960 बाटल्या) असा एकूण 74 लाख 56 हजार 200 रुपयांचा मद्याचा साठा जप्त केल्या. पथकाने रॉयल ब्ल्यू व्हिस्की (Royal Blue Whiskey), आईस मॅजिक ऑरेंज वोडका (Ice Magic Orange Vodka) व रॉयल ब्लंक माल्ट व्हिस्की (Royal Blunk Malt Whisky) च्या बाटल्या जप्त केल्या आहेत. पथकाने मद्य आणि वाहन असा एकूण 1 कोटी 19 लाख 92 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या कारवाईत विजय चंद्रकांत चव्हाण Vijay Chandrakant Chavan (वय-53 रा. सातारा) व सचिन निवास धोत्रे Sachin Niwas Dhotre (वय-31 रा. सांगली) या दोघांना अटक केली आहे. त्यांना वडगाव मावळ न्यायालयात (Vadgaon Maval Court) हजर केले असता 4 नोव्हेंबर पर्य़ंत पोलीस कोठडी (Police Custody) सुनावण्यात आली आहे. (Pune Crime News)

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क महाराष्टर राज्य आयुक्त विजय सुर्यवंशी, संचालक, अमलबजावणी व
दक्षता सुनिल चव्हाण, विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क पुणे विभाग विजय चिंचाळकर यांच्या आदेशानुसार
पुणे विभागाचे अधीक्षक चरणसिंग राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क एफ विभाग पुणे निरीक्षक
दिपक सुपे, सासवड विभागाचे निरीक्षक प्रविण शेलार, दुय्यम निरीक्षक राम सुपेकर, बडदे, आशिष जाधव, मोहिते,
सहाय्यक दुय्यम निरीक्षक सागर धुर्वे, डी.के. पाटील, जवान चावरे, अतुल बारगुळे, तात्या शिंदे, अशोक अदमनकर,
गायकवाड तसेच वाहन चालक अंकुश कांबळे यांच्या पथकाने केली. पुढील तपास पुणे एफ विभागाचे निरीक्षक दिपक सुपे करीत आहेत.

Related Posts