IMPIMP

Pune Crime News | पुणे पोलिसांच्या सलग छापेमारीमुळे गुटख्याचे बडे सप्लायर ‘निजाम’, ‘मलिक’, ‘मंदार’, ‘पंकज’, ‘सुजित’, ‘सागर’, ‘गुड्डू उर्फ साकीब’, ‘निखील’ सैरभैर

by nagesh
Pune Crime News | Due to successive raids by the Pune police, the big suppliers of Gutkha 'Nizam', 'Malik', 'Mandar', 'Pankaj', 'Sujit', 'Sagar', 'Guddu aka Saqib', 'Nikhil' Sairabhair

पुणे (नितीन पाटील) :सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | पोलिस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr)  यांनी अंमली पदार्थ विरोधी मोहिम (Anti-Drug Campaign In Pune City) प्रभावीपणे राबविणार असल्याचे यापुर्वीच स्पष्ट केले होते. त्यानुसार पुणे शहर पोलिसांनी गुरूवार (दि. 2 जानेवारी) पासून शहरातील गुटखा विक्रेत्यांवर आणि गुटख्याची साठवणुक करणार्‍यांवर छापेमारी सुरू केली आहे (Gutkha Ban News). स्थानिक पोलिसांनी सलग चार दिवस अनेक ठिकाणी छापेमारी करून दोन डझनहून अधिक जणांना अटक केली आहे (Raid On Gutkha Sellers) . पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांचा पावित्रा पाहून शहराला मोठया प्रमाणावर गुटखा पुरविणार्‍या ‘टॉप 10’ गुटखा सप्लायरांच्या पाया खालची जमिनच सरकली आहे. त्यांचे धाबे दणाणले असून ते सैरभैर झाले आहेत. प्रामुख्याने पुणे शहर आणि काही प्रमाणावर पिंपरी परिसरात ‘नुजामुद्दीन’, ‘मंदार’, ‘पंकज’, ‘सुजित’, ‘गुड्डू उर्फ साकीब’, ‘सागर’, ‘मलिक’ आणि ‘निखील’ हे गुटखा सप्लाय (Gutkha Distributors in Pune) करतात अशी माहिती मिळत आहे.. त्यामधील काही जणांवर पुणे शहर पोलिस ठाण्यात वेगवेगळया पोलिस ठाण्यात गुन्हे देखील दाखल आहेत पण काही दिग्गजांच्या आशिर्वादाने त्यांना अद्याप अटक झालेली नाही. एकंदरीतच पुणे शहर पोलिस दलातील (Pune Police News) स्थानिक पोलिसांच्या छापेमारीमुळे मोठया सप्लायरचे धाबे दणाणले आहेत. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

बंदी असताना देखील आरोग्यास घत्ततक असलेल्या गुटख्यासह सुगंधी सुपारी आणि पान मसाल्याचा साठा करून त्याची विक्री करणार्‍यांविरोधात पुणे पोलिसांनी मोठी मोहिम उघडली आहे. शहरात गुटख्याची विक्री करणार्‍यांवर आणि त्याचा साठा करून ठेवलेल्या गोदामांवर पुणे शहर पोलिस दलातील फरासखाना, डेक्कन, शिवाजीनगर, समर्थ, सहकारनगर, भारती विद्यापीठ, वारजे माळवाडी, दत्तवाडी, उत्तमनगर, कोथरूड, सिंहगड रोड, चतुःश्रृंगी, चंदननगर, विमानतळ, येरवडा, विश्रांतवाडी, मुंढवा, लोणी काळभोर, हडपसर पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी गुरूवारी (दि. 2) तब्बल 25 ठिकाणी छापे टाकले. त्यांनी 3 लाखांचा मुद्देमाल जप्त करत 32 जणांवर गुन्हे दाखल करून 22 जणांना अटक केली. (Pune Crime News)

 

शुक्रवारी (दि.3)  खडक, भारती विद्यापीठ, सहकारनगर, अलंकार, उत्तमनगर, दत्तवाडी, वानवडी, हडपसर, कोंढवा, लोणी काळभोर पोलिसांनी 15 ठिकाणी छापेमारी करून 4 लाख 59 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला तर 11 जणांना अटक केली. शनिवारी आणि रविवारी देखील पोलिसांनी वेगवेगळया ठिकाणी छापेमारी करून गुटखा विक्री तसेच त्याचा साठा करणार्‍यांवर कारवाई केली. पुणे शहर पोलिसांच्या इतिहासात एवढया मोठया प्रमाणावर गुटखा विक्री आणि साठा करणार्‍यांवर कारवाई होण्याची ही किंबहुना पहिलीच वेळ (वेगवेगळया ठिकाणी छापे टाकण्याची तसेच वेगवेगळे गुन्हे दाखल करण्याची) आहे. शहर पोलिसांनी गुटखा विक्री व साठा करणार्‍यांविरूध्द धडक मोहिम राबविल्याने शहराला मोठया प्रमाणावर गुटखा सप्लाय करणार्‍यांचे धाबेच दणाणले आहेत. एवढेच नव्हे तर गुटख्याचा मोठा ‘सेटअप’ बसविणार्‍या ‘दिग्गज’ आणि ‘गब्बर’ लोक देखील सैरभैर झाले आहेत.

 

पोलिसांनी संपुर्ण शहरात मोठया प्रमाणावर छापेमारी केली असली तरी आता देखील शहरात काही ठिकाणी खुलेआम गुटख्याची विक्री होताना दिसते आहे. शहरात गुटखा विक्रीस पोषक वातावरण नसल्यामुळे सप्लायरकडून किरकोळ गुटखा विक्रेत्याकडे माल पुरविणारे एजंट ‘गायब’ झाले आहेत. शहरातील काही सरकारी कार्यालय, पोलिस चौक्याच्या शेजारी असलेल्या पान टपर्‍यांवर आता देखील गुटख्याची विक्री होताना दिसते. शहरात सातत्याने गुटखा विक्री व साठा करणार्‍यांविरूध्द कारवाई केली गेली तरच गुटख्याची विक्री थांबणार आहे अन्यथा ‘पहिले पाढे पंचावन्न’ अशीच परिस्थिती राहील.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

‘दाम दुप्पट’मुळेच मोठया प्रमाणावर गुटखा विक्री

सप्लायरकडून एजंटांमार्फत किरकोळ गुटखा विक्री करणार्‍या पान टपर्‍यांवर गुटख्याची विक्री एमआरपी अथवा थोडया जादा दराने होते. तोच माल पान टपरी चालक दुप्पट तर गुटखा विक्रीसाठी वातावरण नरम-गरम असल्यास तिप्पट किंमतीला ग्राहकांना विकतो. एकाच दिवसात घेतलेल्या मालाचे पैसे दुप्पट करून मिळत असल्याने शहरातील उपनगरांमध्ये लहान-सहान किराणा दुकानात देखील मोठया प्रमाणावर गुटख्यांची विक्री होते. स्थानिक पोलिसांना कोणत्या ठिकाणी गुटख्याची विक्री होते याची संपुर्ण कल्पना असते. संबंधित पोलिस पान टपरी चालकांकडे ‘महिन्या’तून एखाद दुसरी चक्कर टाकतो अन् त्यांचे संबंध जिव्हाळयाचे होतात. त्यानंतर पान टपरी चालक गुटख्याची खुलेआम विक्री करतो.

 

लोणी काळभोर-यवत बॉर्डरवर कारवाई पण…

लोणी काळभोर आणि यवत पोलिस ठाण्याच्या बॉर्डरवर असलेल्या गुटख्याच्या एका मोठया गोदामावर 26 जानेवारीच्या दोन-चार दिवसांपुर्वी शहर पोलिस दलाच्या गुन्हे शाखेतील एका पथकाने छापा टाकला. गोदामात मोठया प्रमाणावर गुटखा आढळला. तेथे उपस्थित असलेल्यांमध्ये पोलिसांमध्ये हामरातुरी देखील झाली. स्थानिक पोलिस ठाण्यातील अधिकार्‍याची आणि पथकातील संबंधित अधिकार्‍याची तु-तु मै-मै देखील झाल्याची सध्या पोलिस वर्तुळामध्ये खमंग चर्चा आहे. गोदामामध्ये प्रचंड मोठया प्रमाणावर गुटखा असल्याने पोलिस पथकातील एका कर्मचार्‍याने ‘कार’मधून येवून महत्वाची भूमिका बजावत चांगलाच ‘खेल’ केल्याचे देखील बोलले जात आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सप्लायरकडून कर्नाटक-गुजरातमधून आणला जातो ‘आयशर’

शहरातील टॉप 10 सप्लायर हे कर्नाटक आणि गुजरातमधून आयशर टेम्पोने मागणीप्रमाणे माल पुणे शहराच्या जवळ मागवतात. काही सप्लायरची तर पुणे शहरालगत असलेल्या परिसरात मोठ-मोठी गोडाऊन आहेत. तेथे साठवलेल्या माल मागणीनुसार छोटा हत्तीतून पुरविला जातो. गुजरातवरून येणारा माल स्वतः तर कर्नाटकचा माल नं 1 म्हणून विकला जातो. गुटख्याचा मोठा सेटअप बसविणार्‍या दिग्गज आणि ‘गब्बर’ लोकांच्या आशिर्वादामुळे सप्लायरला मोठे कामकाज करणे शक्य होते. गुटख्याचे शहरातील टॉप 10 सप्लायर हे देखील त्यांची महिन्याला चांगलीच खातरजमा करतात. गुरूवार (दि. 2) पासुन शहर पोलिसांनी गुटखा विक्री व साठा करणार्‍यांविरूध्द धडक मोहिम राबविल्याने अनेक सप्लायर यांची ‘भंबेरी’ उडाली आहे तर त्यांनी कामकाज सुरळीत करून घेण्यासाठी मोठया हालचाली सुरू केल्या असल्याची चर्चा सध्या ऐकावयास मिळत आहे.

 

 

दोन सप्लायरचे वास्तव्य पोलिस ठाण्यांच्या जवळ?

शहरला गुटखा सप्लायर करणार्‍या ‘टॉप 10’ सप्लायर्सपैकी ‘मलिक’ आणि ‘सुजित’ हे दोघे ज्या परिसरात रहावयास आहेत त्यापासून पोलिस ठाणे हाकेच्या अंतरावर आहे अशी माहिती मिळते आहे. एवढे मोठे कामकाज करणार्‍यांबद्दल स्थानिक पोलिसांना थोडी देखील माहिती नसावी यावर विश्वासच बसत नाही. ‘चंदन’ कुठे जरी ठेवले तरी त्याचा ‘सुगंध’ येतोच. त्याप्रमाणे हे दिग्गज वास्तव्यास असलेल्या नगरबद्दल पोलिसांना काहीच कल्पना नसावी हे मात्र अतिच. लाखो रूपयांचा गुटखा आणून मोठा प्रमाणावर पुणे शहरात आणि काही प्रमाणावर पिंपरीत सप्लाय करून त्याचे कोटयावधी बनविण्याची प्रॅक्टीस पोलिसांच्या कारवाईमुळे सध्या तरी कोमात गेली असल्याची माहिती मिळत आहे. सप्लायर्संनी कामकाज पुन्हा सुरळीत करण्यासाठी काही दिग्गज आणि ‘गब्बर’ लोकांकडे जोर लावला आहे.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title : Pune Crime News | Due to successive raids by the Pune police, the big suppliers of Gutkha ‘Nizam’, ‘Malik’, ‘Mandar’, ‘Pankaj’, ‘Sujit’, ‘Sagar’, ‘Guddu aka Saqib’, ‘Nikhil’ Sairabhair

 

हे देखील वाचा :

Pune Chinchwad Bypoll Election | ठरलं… राष्ट्रवादीकडून चिंचवड पोटनिवडणुकीसाठी नाना काटेंना उमेदवारी; जयंत पाटलांनी ट्विट करुन दिली माहिती

Pune News | महाराष्ट्र राज्य कारागृह अधिकारी व कर्मचारी वार्षिक क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन

Jitendra Awhad | छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम; म्हणाले…

 

Related Posts