IMPIMP

Jitendra Awhad | छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम; म्हणाले…

by nagesh
Jitendra Awhad | jitendra awhad stands on his comment about his shivaji maharaj controversial comment

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) तसेच शाहिस्तेखान आणि औरंगजेब यांच्यावर केलेल्या विधानामुळे चांगलेच अडचणीत आले आहेत. सत्ताधारी भाजपकडून ठिकठिकाणी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याविरोधात निदर्शने केली जात आहेत. मात्र, जितेंद्र आव्हाड हे आपल्या विधानावर ठाम असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

यावेळी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, ‘मी एका अराजकीय मंचावर उभा होतो. माझ्यासोबत सुषमा अंधारे (Sushma Andhare) यादेखील आहेत. आमच्या पोस्टवर कोठेही राष्ट्रवादीचे (NCP) नाव नाही. मी जेव्हा शिवसन्मान जागर (Shiv Sanman Jagar) यात्रा घेतली होती, तेव्हाही माझ्या मागे राष्ट्रवादी पक्ष नव्हता. मात्र तरीदेखील मी दोन महिने फिरलो. त्यावेळी आम्ही बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांना विरोध केला.’ असे जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठिंब्याबाबत बोलताना स्पष्ट केले.

 

तर यावर पुढे बोलताना ते म्हणाले, ‘प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भूमिका वेगळी असते. माझी एखादी सामाजिक भूमिका असेल तर पक्षातील दुसऱ्याचाही तशीच भूमिका असेल असे नाही. पक्षाच्या राजकीय भूमिकेशी आपण सुसंगत असले पाहिजे. पण ऐतिहासिक भूमिकेत तुमची मतमतांतरं असू शकतात. म्हणूनच आम्ही राष्ट्रवादीत आहोत.’ असे देखील यावेळी बोलताना त्यांनी पक्षाच्या भूमिकेबाबत स्पष्टीकरण दिले.

 

दरम्यान, विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विधानसभा विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल एक विधान केले होते.
ज्यात ते म्हणाले होते की, संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) हे धर्मवीर नव्हते तर ते स्वराज्यरक्षक होते.
त्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) औरंगजेबाविषयी एक विधान केले होते.
त्यावर देखील यावेळी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली.
यावेळी बोलताना आव्हाड म्हणाले की, ‘मी फक्त औरंगजेबाने बाजूचे मंदिर पाडले नव्हते, असे म्हणालो होतो.
आजही जाऊन पाहिले तर तेथे मंदिर दिसेल. मी औरंगजेबाचे कौतुक करत नाही.
यामध्ये असलेले कांगोरे बघावेत असे माझे मत आहे.’ असे स्पष्टीकरण आव्हाडांनी दिले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

तर यापुढे बोलत असताना जितेंद्र आव्हाडांनी आपण आपल्या मतावर ठाम असल्याचा पुनरूच्चार केला.
ते म्हणाले, ‘मी परवा केलेल्या विधानावर अजूनही ठाम आहे. मी ते विधान जाणूनबुजून केलेले नाही.
मी एक तास सहा मिनिट भाषण केले आहे. मात्र फक्त अर्ध्या मिनिटाचा व्हिडीओ दाखवला जात आहे.
मी त्या व्हिडीओला नाकारत नाहीये. त्या वक्तव्याबद्दल मी अनेक संदर्भ दिले आहेत.’
असे यावेळी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले.

 

Web Title :- Jitendra Awhad | jitendra awhad stands on his comment about his shivaji maharaj controversial comment

 

हे देखील वाचा :

Women T20 World Cup | कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान येणार आमने – सामने; कधी आणि कुठे? जाणून घ्या सामन्याचे संपूर्ण शेड्युल

Aaditya Thackeray | मंत्रीमंडळ विस्तारावरून आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला फटकारले; म्हणाले…

Pune Kasba Peth Bypoll Election | कसबा पोटनिवडणुक : काँग्रेस पक्षातील बंडखोरी उघड; नाराज बाळासाहेब दाभेकर भरणार अपक्ष उमेदवारी अर्ज

 

Related Posts