IMPIMP

Pune Crime News | पुण्यातील वारजे माळवाडी परिसरात भरदिवसा युवकावर गोळीबार, प्रचंड खळबळ

by nagesh
Pune Crime News | Firing Jay Bhavani Chowk Ram Nagar Of Warje Malwadi Area 21 years youth injurder pune police is on the spot

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन –  Pune Crime News | पुण्यात भरदिवसा वारजे माळवाडी परिसरात गोळीबार (Firing In Warje Malwadi Pune) झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. वारजे माळवाडी पोलिस (Warje Malwadi Police Station) घटनास्थळी दाखल झाले असून या गोळीबारात 21 वर्षाचा युवक जखमी झाला आहे. (Pune Crime News)

सुरज तात्याबा लंगार (21, रा. वारजे माळवाडी) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, वारजे माळवाडी परिसरातील जय भवानी चौक पाण्याच्या टाकीजवळुन सुरज जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी त्याच्यावर गोळीबार केला. एकुण 3 राऊंड फायर केले असल्याची माहिती वारजे माळवाडी पोलिसांनी दिली आहे.

गोळी सुरजला डाव्या बाजूला चाटून गेली असून तो जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रूग्णालयात रवाना करण्यात आले आहे. दरम्यान, स्थानिक पोलिस आणि गुन्हे शाखेतील (Pune Police Crime Branch) वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पुण्यात भरदिवसा गोळीबार झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

ही घटना शनिवारी दुपारी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
भर दुपारी वारजे माळवाडी परिसरात गोळीबाराची घटना घडल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.
घटनास्थळी मोठया प्रमाणावर नागरिकांची गर्दी झाली होती.

Web Title : Pune Crime News | Firing Jay Bhavani Chowk Ram Nagar Of Warje Malwadi Area
21 years youth injurder pune police is on the spot

Related Posts