IMPIMP

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : कोंढवा पोलिस स्टेशन – विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन परस्पर हडप केली 50 लाखांहून अधिक रक्कम; पश्चिम महाराष्ट्र एज्युकेशन ट्रस्टमधील गडबड घोटाळा, 8 जणांवर गुन्हा दाखल

by nagesh
Pune Crime News | Kondhwa Police Station - More than 50 lakhs extorted by taking money from students; The scam in Paschim Maharashtra Education Trust, case filed against 8 persons

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- Pune Crime News | पश्चिम महाराष्ट्र एज्युकेशन ट्रस्ट (Paschim Maharashtra Education Trust) व त्यांच्या अंतर्गत येणार्‍या शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांकडून येणारी फी संस्थेच्या खात्यात जमा न करता ५० लाखांहून अधिक रक्कमेचा अपहार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी पश्चिम महाराष्ट्र एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष जुबेर रशिद खान (वय ४४, रा. नाना पेठ) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५२८/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तबस्सुम अन्वर शेख Tabassum Anwar Shaikh (वय ४८), अन्वर नजीमुल्ला शेख Anwar Najimullah Shaikh (वय ५५, दोघे रा. कॅम्प), तरन्नुम कादर सय्यद Tarannum Kadar Syed (वय ४३), कादर छोटेमिया सय्यद Kader Chhotemia Syed (वय ५२, रा. लोणावळा), नाजेमा साहेल खान Najema Sahel Khan (वय ४२), सोहेल इस्माईल खान Sohail Ismail Khan (वय ४८, रा. अम्मार सोसायटी, कोंढवा), असिन आरीक शेख Asin Arik Shaikh (वय ३७), आरीफ शेख (वय ४०) यांच्यावर गुन्हा First Information Report (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार कोंढव्यातील मिठानगरमधील पश्चिम महाराष्ट्र एज्युकेशन ट्रस्ट या संस्थेत २०१८ पासून आतापर्यंत झाला आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पश्चिम महाराष्ट्र एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष आहेत.
ट्रस्ट व त्या अंतर्गत येणार्‍या शैक्षणिक संस्थांचे (Educational Institutions) कागदपत्रावर आरोपींनी खोट्या
सह्या केल्या. विद्यार्थ्यांकडून येणारी फी संस्थेच्या खात्यावर जमा न करता ५० लाखांहून अधिक रक्कमेचा
अपहार करुन शासनाची व संस्थेची फसवणूक (Cheating Case) केली. (Pune Crime News)

 

आरोपींनी फिर्यादी व फिर्यादीचे आईच्या नावाने बनावट व खोटी सही करुन संस्थेचे लेटरहेड वापरुन जव्वाद शेख
या शिक्षकाची अनुदानित पदावर नेमणूक केली आहे.
नाजेमा साहेल खान या सतत आजारी असून गैरहजर असताना ही शाळेच्या मस्टरवर एकत्रित सही करुन
शासनाची फसवणूक (Fraud Case) केली असल्याच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सहायक पोलीस निरीक्षक मोहिते तपास करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :  Pune Crime News | Kondhwa Police Station – More than 50 lakhs extorted by taking money from students; The scam in Paschim Maharashtra Education Trust, case filed against 8 persons

 

हे देखील वाचा :

Pune Triple Talaq Case | पुणे ट्रिपल तलाक केस : विवाहीतेचा शारीरिक, मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीला अटक ! सासु, सासरे, नणंद व नंदावाची अटकपुर्वसाठी न्यायालयात धाव

75 Rs New Currency Launch | अर्थमंत्रालाची घोषणा, बाजारात येणार ७५ रुपयांचे नवे चलन; नव्या संसद भवनाच्या उद्घाटनप्रसंगी करणार लाँच

Maharashtra Congress | नाना पटोलेंना पदावरुन हटवा, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या गटाची हायकमांडकडे मागणी: हायकमांड महाराष्ट्रात भाकरी फिरवणार?

 

Related Posts