IMPIMP

75 Rs New Currency Launch | अर्थमंत्रालाची घोषणा, बाजारात येणार ७५ रुपयांचे नवे चलन; नव्या संसद भवनाच्या उद्घाटनप्रसंगी करणार लाँच

by nagesh
75 Rs New Currency Launch | Finance Minister's announcement, new currency of Rs 75 in the market; It will be launched on the occasion of the inauguration of the new Parliament building

दिल्ली : वृत्तसंस्था – 75 Rs New Currency Launch | देशातील नव्या संसदभवनाचे (New Parliament House) उद्घाटन येत्या २८ मे ला
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) हस्ते होणार आहे. अमृत महोत्सवाच्या निमित्ताने साकारण्यात आलेले हे नवीन संसद भवन देशाच्या
इतिहासाला, संस्कृतीला नव्या युगाची किनार देणार आहे. संपूर्ण देशात या नवीन संसद भवनाविषयी कुतूहल व उत्सुकता आहे. दरम्यान देशाच्या अर्थ
मंत्रालयानेही (Ministry of Finance) एक मोठी घोषणा केली आहे. नवीन संसद भवन उद्घाटनाच्या स्मरणार्थ ७५ रुपयांचे नाणे देशाला सुपूर्त केले
जाणार आहे. (75 Rs New Currency Launch)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

२८ मे ला पार पडणारा हा उद्घाटन सोहळा अत्यंत महत्त्वाचा आणि लोकशाहीचे एक उज्ज्वल पर्वाचे प्रतीक असणार आहे.
या उद्घाटनाला सगळ्या पक्षांनी उपस्थिती लावावी अशी सत्ताधाऱ्यांची इच्छा असली तरी २० विरोधी पक्षांनी यावर आधीच बहिष्कार (Boycott By Oppositions) टाकला आहे.
उद्घाटनाचा वाद सुप्रीम कोर्टात (Supreme Court) गेला असून त्यावरून राजकीय खडाजंगी सुरु आहे.
मात्र या सर्व राजकीय नाट्यमय घडामोडींमध्येच आता अर्थमंत्रालयाकडून नव्या चलानाची घोषणा करण्यात
आली आहे.

 

अर्थमंत्रालयाने या ७५ रुपयांच्या नव्या चलनाबद्दल माहिती देताना सांगितले आहे की, हे नवीन चलन नाणे (Coin) स्वरूपाचे असणार असून ते गोलाकार पद्धतीचे असेल.
या ७५ रुपये नाण्याचा व्यास (Diameter) ४४ मिलीमीटर असणार आहे.
हे नाण तयार करण्यासाठी ५० टक्के चांदी, ४० टक्के तांबे, ५ टक्के निकेल आणि ५ टक्के जस्त असलेले चतुर्थांश मिश्रधातू वापरण्यात येणार आहे.
तसेच या नाण्यावर संसद परिसर आणि नवीन संसद भवनाची प्रतिमा असेल.
संसद परिसराच्या प्रतिमेच्या खाली आंतरराष्ट्रीय अंकांमध्ये ‘2023’ हे वर्ष देखील कोरलेले असणार आहेत. (75 Rs New Currency Launch)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title : 75 Rs New Currency Launch | Finance Minister’s announcement, new currency of Rs 75 in the market; It will be launched on the occasion of the inauguration of the new Parliament building

 

हे देखील वाचा :

Maharashtra Congress | नाना पटोलेंना पदावरुन हटवा, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या गटाची हायकमांडकडे मागणी: हायकमांड महाराष्ट्रात भाकरी फिरवणार?

ACB Demand Case | पाण्याच्या टँकरचे बील मंजूर केल्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी, आश्रम शाळेच्या मुख्याध्यापकावर पुणे अ‍ॅन्टी करप्शनकडून FIR

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : मार्केटयार्ड पोलिस स्टेशन – रात्री क्रिकेट खेळणार्‍या मुलांना टोळक्याने केली मारहाण; मोटारसायकल, कारची केली तोडफोड

 

Related Posts