IMPIMP

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज – कोथरूड पोलिस स्टेशन : उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीमधून करंट लागल्याने एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी

by nagesh
Pune Crime News | Kothrud Police Station: One killed, another critically injured due to electrocution from high voltage power line

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- Pune Crime News | टीव्ही केबल (TV Cable) ओढण्याचे काम करीत असताना उच्च दाबाच्या विद्युत
वाहिनीमधून (High Pressure Power Lines) करंट लागल्याने एकाचा मृत्यू झाला आहे तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना गुरूवारी सकाळी
11.30 वाजण्याच्या सुमारास कोथरूड (Kothrud) परिसरातील सुतारदरामध्ये (Sutardara) लेन नंबर 4 जवळील साई निवास या घराच्या टेरेसवर
घडली आहे. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पुंडलिक लक्ष्मण शिंदे (33, रा. सुतारदरा, कोथरूड) असे मृत्यूमुखी पडलेल्याचे नाव आहे तर पप्पू उर्फ स्वप्नील शिवराम बोडके (28, रा. गल्ल नं. 23, गणराज मित्र मंडळ, सुतारदरा) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. (Pune Crime News)

 

याबाबत अधिक माहिती अशी की, पुंडलिक शिंदे आणि पप्पू उर्फ स्वप्नील बोडके हे दोघे टीव्ही केबल ओढण्याचे काम केबल ऑपरेटर नितीन पवार (रा. पौड फाटा) यांच्याकडे करत होते. गुरूवारी सकाळी ते दोघे सुतारदरा येथील एका घराच्या टेरेसवर टीव्ही केबल ओढण्याचे काम करीत असताना त्यांना उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीचा करंट लागला. त्यामुळे शिंदे याचा मृत्यू झाला तर बोकडे हा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात (Kothrud Police Station) अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

 

Web Title :-  Pune Crime News | Kothrud Police Station: One killed, another critically injured due to
electrocution from high voltage power line

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | 33 लाखाच्या अपहार प्रकरणी वनाज सहकारी गृह रचना संस्थेच्या माजी अध्यक्षांसह 3 पदाधिकारी आणि 2 लेखा परिक्षाकांविरूध्द कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Palkhi Sohala 2023 | पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे – जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

Pune Police Mundhwa News | मुंढवा-केशवनगरमधील परिस्थिती चिंताजनक?, वरिष्ठ पोलिस निरीक्षक ‘एक्सटेन्शन’च्या ‘जुगाड’मध्ये

Pay Fair Cup Under-13 Cricket Tournament | ‘पे फेअर करंडक’ अजिंक्यपद 13 वर्षाखालील मुलांची क्रिकेट स्पर्धा ! 30 यार्डस् क्रिकेट अ‍ॅकॅडमी, ए.के. स्पोर्टस् अ‍ॅकॅडमी संघांची विजयी कामगिरी

 

Related Posts