IMPIMP

Pune Crime News | Plunge – All Day Kitchen and Bar Pub चा Owner Jitesh Mehta पदेशात? 3 सट्टेबाजांच्या पोलिस कोठडीत 4 दिवसांची वाढ; पैशांच्या देवाण-घेवाणीसाठी G-Pay, UPI चा प्रचंड वापर, अनेक व्यापारी ‘रडार’वर

by nagesh
Pune Crime News | Plunge – All Day Kitchen and Bar Pub Owner Jitesh Mehta is out of country? 3 bookies’ police custody extended by 4 days; Heavy use of G-Pay, UPI for money transfer, on many merchant ‘radar’

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | पुणे शहर पोलिसांच्या (Pune City Police) गुन्हे शाखेतील (Pune Police Crime Branch) खंडणी विरोधी पथकाने (Anti Extortion Cell (AEC) Pune) कोंढव्यातील साईबाबा नगरमधील (Saibaba Nagar Kondhwa) धर्मश्री सिग्नेचर सोसायटीमधील (Dharmashree Signature Society) बंद फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट मॅचर बेटिंग (Online Cricket Betting) घेणार्‍या सट्टेबाजांचा पर्दाफाश केला होता (IPL Cricket Betting Arrest).

त्यावेळी तिघांना अटक करण्यात आली होती तर Plunge – All Day Kitchen and Bar Pub चा मालक जितेश मेहता (Jitesh Mehta) (रा. फ्लॅट नं. 103, आतिथी रेस्टॉरंट मागे, महर्षी नगर, पुणे) आणि मध्यप्रदेशातील बुक्की (Cricket Bookies In Madhya Pradesh) अक्षय तिवारी Cricket Booki Akshay Tiwari हा फरार झाला होता. दरम्यान, अटक केलेल्या तिघांची पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना आज (मंगळवार) न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांच्या पोलिस कोठडीत 4 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. सट्टेबाज जितेश मेहता हा परदेशात असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस जितेश मेहता आणि अक्षय तिवारीचा शोध घेत आहेत. (Pune Crime News)

पोलिसांनी वसीम हनीफ शेख Wasim Hanif Shaikh (39, रा. फ्लॅट नं. 204, धर्मश्री सिग्नेचर सोसायटी, साईबाबा नगर, कोंढवा खुर्द), इक्रामा मकसुद मुल्ला Ikrama Maqsud Mulla (26, रा. मदने सोसायटी, फ्लॅट नं. 16, घोरपडी पेठ, पुणे) आणि मुसाबिन मेहमुद बाशाइब Musabin Mehmood Bashaib (35, रा. 371, सोमवार पेठ, नरपतगिरी चौक, हनुमान मंदिराच्या मागे, पुणे) यांना फ्लॅटमधून अटक केली होती. त्यांची पोलिस कोठडीची मुदत आज संपल्याने त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले आहे. त्यावेळी न्यायालयाने त्यांच्या पोलिस कोठडीत 4 दिवसांची वाढ केली आहे.

 

त्यांच्यासह पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील प्रसिध्द पबचा मालक जितेश मेहता Pub Owner Jitesh Mehta (रा.पुणे) आणि मध्यप्रदेशातील बडा बुक्की अक्षय तिवारी Cricket Booki Akshay Tiwari (रा. इंदौर, मध्यप्रदेश) यांच्याविरूध्द कोंढवा पोलिस स्टेशनमध्ये (Kondhwa Police Station) भादंवि कलम 420, 34 तसेच जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम 4 (अ), 5 सह भारतीय टेलीग्राफ अ‍ॅक्ट कलम 25(क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस नाईक शंकर शिवाजी संपते Shankar Shivaji Sampate (बक्कल नं. 7812, नेमणुक – खंडणी विरोधी पथक-1, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. (Pune Crime News)

अटक आरोपींनी क्रिकेटचा सट्टा घेण्यासाठी मोठया प्रमाणावर G-Pay, UPI आयडीचा वापर केला आहे.
त्यांची अनेक व्यवहार गुगल पे आणि इतर युपीआय आयडीवरून झालेले आहेत.
त्यापैकीच्या काही व्यवहारांचे धागेदोर पोलिसांच्या हाती लागले आहेत. सट्टेबाजांनी काही व्यापार्‍यांच्या अकाऊंटवर पैसे ट्रान्सफर केल्याची देखील माहिती समोर आली आहे.

 

सट्टेबाजांच्या लाईनवर अनेक उद्योगी लोक होती. त्यांचे पितळ आता बाहेर येण्यास सुरूवात झाली.
बुक्कींनी 1 लाख रूपये एका अकाऊंटवर ट्रान्सफर केले आहेत. त्याचा तपशील पोलिसांना मिळाला आहे.
परदेशवारी करण्यास गेलेल्या जितेश मेहता आणि मध्यप्रदेशातील बुक्की अक्षय तिवारीचा देखील
पोलिस युध्दपातळीवर शोध घेत आहेत.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलिस आयुक्त संदिप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
गुन्हे शाखेचे अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale), पोलिस उपायुक्त अमोल झेंडे
(DCP Amol Zende), सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर (ACP Satish Govekar) यांच्या मार्गदर्शनाखाली
खंडणी विरोधी पथक-1 चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय वाघमारे (Sr PI Ajay Waghmare),
पोलिस उपनिरीक्षक मोहनदास जाधव (PSI Mohandas Jadhav), पोलिस अंमलदार सुधीर इंगळे, पोलिस
अंमलदार शंकर संपते, पोलिस प्रदीप शितोळे, पोलिस विनोद साळुंखे, पोलिस सदोबा भोजराव, पोलिस संग्राम शिनगारे,
पोलिस चेतन शिरोळकर, पोलिस सुरेंद्र जगदाळे, पोलिस सचिन अहिवळे आणि इतर पोलिसांनी सट्टेबाजांच्या
रॅकेटचा पर्दाफाश केला होता.

Web Title : Pune Crime News | Plunge – All Day Kitchen and Bar Pub Owner Jitesh Mehta is out of country? 3 bookies’ police custody extended by 4 days; Heavy use of G-Pay, UPI for money transfer, on many merchant ‘radar’

Related Posts