IMPIMP

Pune Crime News | पुण्यातील सराईत गुन्हेगार विनोद जामदारे व त्याच्या टोळीवर ‘मोक्का’, पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची 10 वी कारवाई

by nagesh
Pune Crime News | MCOCA 'Mokka' Acction on the criminal gang spreading terror along Tadiwala Road

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या (Sinhagad Road Police Station) हद्दीत दहशत निर्माण करणाऱ्या विनोद शिवाजी जामदारे व त्याच्या इतर 2 साथीदारांवर पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr) यांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई (MCOCA Action) Mokka केली आहे. पोलीस आयुक्तांनी आजपर्यंत 10 टोळ्यांवर मोक्का कारवाई (Pune Crime News) केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

टोळी प्रमुख विनोद शिवाजी जामदारे (वय-32 रा. वडगाव, मुळ रा. लोणारवाडी, ता. परांडा, जि. उस्मानाबाद-Osmanabad), आकाश सुभाष गाडे (वय-21 रा. सिंहगड रोड, पुणे), गणेश दिलीप म्हसकर (वय-23 रा. माणिकबाग, पुणे मुळ रा. मुपो अंबी, पानशेत, ता. वेल्हा) अशी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999 अंतर्गत म्हणजे मोक्काची कारवाई करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. (Pune Crime News)

 

आरोपी विनोद जामदारे हा सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. आरोपीने त्याच्या इतर दोन साथीदारांच्या मदतीने 16 नोव्हेंबर 2022 रोजी एकाला तसेच जीवे मारण्याच्या उद्देशाने लाथा-बुक्क्यांनी मारहाण करुन धारदार शस्त्राच्या उलट्या बाजूने डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. आरोपी विनोद जामदारे व त्याच्या इतर दोन साथीदारांवर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात आयपीसी 307, 504 (2), 34, आर्म आर्म अॅक्ट (Arm Act), महाराष्ट्र पोलीस कायदा (Maharashtra Police Act), क्रिमिनल लॉ अमेंडमेंट (Criminal Law Amendment) नुसार गुन्हा (FIR) दाखल करुन अटक (Arrest) केली आहे.

 

आरोपींनी टोळी तयार करून अवैध मार्गाने आर्थिक फायद्यासाठी चिथावणी देवून टोळीच्या फायद्यासाठी वडगाव, धायरी, हिंगणे, माणिकबाग, महादेवनगर, सिंहगड रोड, दत्तवाडी, वारजे व हवेली परिसरात दहशत निर्माण केली आहे. तसेच धमकी देऊन धायरी, हिंगणे व सिंहगड रोड परिसरातील स्थानिक रहीवाशी, व्यावसायीक यांना दमदाटी व मारहाण करणे यासारखे गंभीर गुन्हे वारंवार केले आहेत. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई (Preventive Action) करण्यात आली होती. मात्र त्यांच्यात काहीच सुधारणा झाली नाही त्यांनी पुन्हा गंभीर गुन्हे केले आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सिंहगड रोड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात मोक्का कलमांचा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे (Senior Police Inspector Shailesh Sankhe),
पोलीस निरीक्षक गुन्हे जयंत राजुरकर (Police Inspector Crime Jayant Rajurkar) यांनी
पोलीस उपायुक्त परिमंडळ-3 सुहेल शर्मा (DCP Suhail Sharma) यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त
पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale) यांना सादर केला.
प्राप्त प्रस्तावाची आणि कागदपत्रांची पडताळणी करुन मोक्का कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे (ACP Rajendra Gallande) करीत आहेत.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे,पोलीस आयुक्त परिमंडळ-3 सुहेल शर्मा, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे
यांच्या सुचनेनुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, पोलीस निरीक्षक गुन्हे जयंत राजुरकर
यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम (API Sachin Nikam),
पोलीस उपनिरीक्षक गणेश मोकाशी (PSI Ganesh Mokashi), महिला पोलीस अंमलदार मिनाक्षी महाडीक,
पोलीस अंमलदार स्मित चव्हाण, प्रथमेश गुरव यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime News | Police Commissioner Ritesh Kumar’s 10th action against Vinod Jamdare and his gang ‘Mokka’, police commissioner Ritesh Kumar

 

हे देखील वाचा :

Sania Mirza | सानिया मिर्झाचा अबु धाबी ओपनमध्ये पराभव; पहिल्याच फेरीत पडली बाहेर

Pune Crime News | जीवे मारण्याची धमकी देत महिलेसोबत गैरवर्तन, लोणीकंद परिसरातील प्रकार

Pune Crime News | लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार, कोंढवा परिसरातील घटना

 

Related Posts