IMPIMP

Pune Crime News | पुण्यात रस्त्यावरील वेश्या व्यवसायामुळे महिलांना चालणे झाले अवघड; ‘चलती क्या’ म्हणून पायी जाणार्‍या महिलेचा केला विनयभंग

by nagesh
Molestation Case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | शहरातील अनेक रस्त्याच्या कडेला उभे राहून तरुणी, महिला बिनधास्तपणे ग्राहकांची (Prostitution) वाट पहात असतात. आंबट शौकीन त्यांच्याशी हितगुज करुन शारीरीक भुक भागविण्यासाठी घेऊन जातात. अनेक ठिकाणी हे सायंकाळनंतर दृश्य दिसून येते. पण, त्याचा त्रास इतर सामान्य तरुणी, महिलांना वेळोवेळी होताना दिसू लागला आहे. कॅम्पातील ब्लु नाईल चौकाकडून (Blue Nile Chowk Camp) रेल्वे स्टेशनकडे जाणार्‍या रस्त्यावर एका महिलेला हा अनुभव आला. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याबाबत येरवडा येथील एका ३३ वर्षाच्या महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundagarden Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २३३/२३) दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या बुधवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ब्लु नाईल चौकातून रेल्वे स्टेशनकडे पायी जात होत्या. पुना क्लबच्या गेटजवळ त्या आल्या असताना एक कार त्यांच्या जवळ आली. चालकाने काच खाली करुन त्यांना शुकशुक करुन बोलावले. फिर्यादी या कशासाठी बोलावतो, हे पाहण्यासाठी कारजवळ गेल्या. तेव्हा त्याने ‘‘चलती क्या तेरे को दोन हजार देता’’ असे म्हणाला. त्यावर फिर्यादी यांनी ‘‘ए चल निघ येथून मी तुला काय तशी वाटते का’’ असे उत्तर दिले. यावर त्याने फिर्यादी यांना वाईट वाईट शिवीगाळ करुन जोरात गाडी चालवत निघून गेला. पोलीस उपनिरीक्षक नळकांडे (PSI Nalkande) तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | street prostitution in pune makes it difficult for women to walk a woman walking on foot was molested

हे देखील वाचा

Related Posts